Next
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०१७’ जाहीर
प्रेस रिलीज
Monday, December 25 | 12:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि प्रबोधन माध्यम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ जाहीर झाले आहेत.

‘गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे येथील महसूल ​विभागीय ​आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’ चे संपादक मुकेश माचकर, ज्ञान प्रबोधिनीच्या स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख (ग्रामीण विभाग) वर्णा गोखले, आणि कुरूंजी (ता. भोर) येथील ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गृह बांधणी, पर्यटन प्रकल्पासाठी सिनर्जी हॉलिडे व्हिलेज यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’साठी करण्यात आली आहे,’ अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी दिली.

‘सिनर्जी’च्या वतीने संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव आणि अमृता देवगावकर हा सन्मान स्वीकारतील.

‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’साठी ​एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी​ डिप्लोमाचे प्राचार्य व्ही. एन. जगताप आणि हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट​चे कर्मचारी खतीब अजाझ हुसेन यांची निवड करण्यात आली आहे. ‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी इनामदार यांचा ७३वा वाढदिवस असून, सन्मानाचे नववे वर्ष आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरणाविषयी :
दिवस : गुरुवार, २८ डिसेंबर २०१७
वेळ : सकाळी नऊ वाजता
स्थळ : असेंब्ली हॉल, महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस), पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link