Next
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिलांमध्ये जागृती
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 11:22 AM
15 0 0
Share this article:

ठाणे : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती होण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमात मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी, तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित ठाणे जिल्ह्यातील शहापूर विभागातील कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य, महिला सचिव इंजि. गंगाजल पाटील यांनी महिला-मुलींना मार्गदर्शन केले. 

या वेळी बोलताना पाटील म्हणाले, ‘स्त्रियांची मासिक पाळी हा आता न बोलण्याचा विषय राहिला नाही, किंबहुना मागील काही दिवसांपासून हा महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृतीचा मध्यवर्ती विषय झाला आहे. मासिक पाळी दरम्यान अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्ग झाल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापासून बचावासाठी बाजारात विविध सॅनिटरी पॅड्स आहेत व जनजागृतीमुळे त्यांचा वापरदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.’

‘मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने रेड डॉट चॅलेंज (Red Dot Challange) अभियान राबवले आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या डाव्या हातावर लाल रंगाचा एक ठिपका करावा लागणार आहे. हा ठिपका स्पष्ट दिसणार हवा. यानंतर हातावरील ठिपका दिसेल अशा पद्धतीने तुमचा एक सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. हा फोटो पोस्ट करताना 'Menstruation Matters' हा टॅग वापरायचा आहे. मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर व्हावेत यासाठी हा एक प्रयत्न आहे,’ अशी माहिती पाटील यांनी या वेळी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search