Next
विना हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
BOI
Tuesday, January 22, 2019 | 04:46 PM
15 0 0
Share this story


पुणे : सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जात हुंड्यांची अनिष्ट प्रथा व त्यामुळे गोर-गरिबांच्या मुलामुलींना व पालकांना होणाऱ्या त्रासाचे निराकरण करण्यासाठी येथील ‘विश्वजागृती मिशन ट्रस्ट’ संचलित ‘पुण्यधाम आश्रम परिवारा’तर्फे यंदाही ‘विना हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. 

शनिवारी (२६ जानेवारी २०१९) दुपारी १२.४७ वाजता पिसोळी येथील पुण्यधाम परिसरात या विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत एकूण ३८ विवाह संपन्न झाले आहेत. यंदा एकूण १६ जोडप्यांची नावनोंदणी झालेली आहे. त्यात महाराष्ट्रातील १६ कुळी मराठा, हिंदू बंगाली, हिंदू महार, हिंदू मातंग, हिंदू भंगी, हिंदू वाणी, हिंदू तेलगू मदलवालू, हिंदू बौद्ध, वाणी लिंगायत, हिंदू बेरड, हिंदू रजपूत, हिंदू कोळी, हिंदू कुणबी, असे एकंदर १३ जातींचा समावेश असलेले विविध जिल्ह्यातून व तालुक्यातून समाविष्ट झालेले जोडपे आहेत.

या विना हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आठ आंतरजातीय जोडपी असून जातीनुसार आठ जोडपी आहेत. सदर विवाह सोहळा हा वैदिक पद्धतीने होत असून प्रत्येक जोडप्याला संसारोपयोगी भांडी देण्यात येणार आहेत. तसेच विवाह सोहळ्यात वऱ्हाडी व इतर उपस्थितांसाठी स्नेह भोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. 

विश्वजागृती मिशन ट्रस्ट संचलित पुण्यधाम आश्रम परिवार ही सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था असून यांच्या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये आपत्तीग्रस्त गरजू मुलांचे शिक्षण, विधवांचे पुनर्वसन, रक्तदान शिबिरे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी शाळा, आरोग्य सेवा फिरता दवाखान्यामार्फत सेवा, हृदयरोगाने ग्रस्त शेकडो मुलांना आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे पुण्यधाम आश्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रम, भोजनालये, दवाखाने, औषधालये, मनोरंजन सभागृह, ध्यानकेंद्र, गोशाळा, नर्सरी, तपोवन, ग्रंथालय, फिरता दवाखाना, आपदग्रस्त खेडी दत्तक घेणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे. तसेच वैज्ञानिक क्षेत्रात अनमोल कार्य करणाऱ्या संशोधकांचा विशेष गौरव केला जातो. सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वकील, डॉक्टर, अभियंते यांना प्रोत्साहनपर रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येतो. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link