Next
‘एअरटेल-अॅमेझॉन’तर्फे वाजवी दरात फोर-जी स्मार्टफोन्स
प्रेस रिलीज
Wednesday, May 23, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारती एअरटेल (एअरटेल) ही भारताची सर्वात मोठी टेलिकम्युनिकेशन्स सेवा देणारी कंपनी व अॅमेझॉन इंडियाने त्यांच्या धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. या सहयोगांतर्गत देशभरात वाजवी दरातील स्मार्टफोन्सची रेंज सादर करण्यात येणार आहे. लाखो भारतीय आता प्रथमच फोर-जी स्मार्टफोन खरेदी करू शकतात किंवा त्यांच्या आवडीनुसार प्रगत फोर-जी स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करू शकतात. या वाजवी दरातील फोर-जी डिव्हाइसेसच्या रेंजची किंमत फक्त तीन हजार ३९९ रुपयांपासून सुरू होते.

या सहयोगाचा एक भाग म्हणून ‘अॅमेझॉनडॉटइन’वरील सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ऑनर, एलजी, लेनोव्हो व मोटो या लोकप्रिय डिव्हाइस ब्रॅंड्सच्या ६५ हून अधिक फोर-जी स्मार्टफोन्सवर एकूण दोन ६०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. ग्राहकांना ३६ महिन्यांच्या कालावधीमध्ये एअरटेलकडून दोन हजार रुपयांचे कॅशबॅक मिळेल; तसेच ‘अॅमेझॉनडॉटइन’ या भारतातील जलदगतीने विकसित होत असलेल्या मोबाईल रिचार्ज व्यासपीठावर १६९ रुपयांच्या एअरटेल रिचार्जवर ६०० रुपयांची अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळू शकते.

‘एअरटेल’च्या मुख्य विपणन अधिकारी वाणी वेंकटेश म्हणाल्या, ‘अॅमेझॉन इंडियासोबतच्या या सहयोगामुळे आमच्या ‘मेरा पहला फोर-जी स्मार्टफोन’ या देशभरात ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या उपक्रमाला आणखी चालना मिळेल. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्याचे कार्य यापुढेही असेच सुरू राहील आणि प्रत्येक भारतीयाला त्यांचा स्वतःचा स्मार्टफोन असण्याचे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये मदत करण्यासोबतच डिजिटल सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू.’

‘अॅमेझॉन’च्या विभाग व्यवस्थापनाचे संचालक नूर पटेल म्हणाले, ‘आम्हाला भारती एअरटेलसोबतच्या सहयोगाने देशभरातील भारतीय ग्राहकांना डिजिटल सुविधा देताना खूप आनंद होत आहे. या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना वाजवी दरात उच्च दर्जाच्या फोर-जी तंत्रज्ञानाचा आनंद देण्यासोबत चार्जवर खास कॅशबॅक ऑफर देत आहोत. ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देण्याच्या आमच्या फोकससह ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी ‘अॅमेझॉनडॉटइन’वर सर्व अॅमेझॉन एक्सक्लुसिव्ह स्मार्टफोन्सवर उपलब्ध असेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link