Next
बालगोपाळांनी साकारले प्रतापगड, राजगड
प्रेस रिलीज
Monday, November 12, 2018 | 12:17 PM
15 0 0
Share this story

किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धकांना गौरविताना मान्यवर.

पुणे : भाऊबिजेचे औचित्य साधून दिग्दर्शक रामकुमार गोरखनाथ शेडगे व सिद्धनाथ गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक बाल स्पर्धकांनी सहभागी होत प्रतापगड, रायगड, राजगड, सज्जनगडडांच्या प्रतिकृती उभारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा दिला. स्पर्धेच्या अटींची पूर्तता करत अतिशय सुरेख किल्ले स्पर्धकांनी साकारले होते.

बालगोपाळांनी साकारलेले किल्ले

या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना दिग्दर्शक शेडगे म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा शिवरायांच्या पराक्रमाची भूमी आहे. साताऱ्यातील गडकोट प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हाच छत्रपतींचा वारसा आपल्या येणाऱ्या पिढीने जपून तो टिकवला पाहिजे. या किल्ले स्पर्धेतून शिवकालीन गडकोटांना उजाळा मिळावा हाच आमचा उद्देश होता.’

सुशांत शेडगे, ऋषिकेश शेडगे, साहिल शेडगे, यशराज दबडे, चैतन्य ढेरे, विशाल पवार, नैतिक शेडगे, देवराज शेडगे, विवेक पवार या आठ विजेत्या स्पर्धकांना ‘सन्मान गुंफण’चे संपादक बसवेश्वर चेणगे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बाजारे, सिद्धनाथ शेडगे, लता शेडगे, व्यंकट शेडगे, सतीश देसाई, नाना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

असे उपक्रम राबवणे कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांतूनच आपल्या इतिहासाला नवसंजीवनी मिळणार असल्याचे चेणगे यांनी या प्रसंगी नमूद केले. प्रकाश पवार यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धनाथ शेडगे, अक्षय शेडगे, श्रीधर शेडगे, विशाल शेडगे अभिजित जाधव यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nikhil shedage About 99 Days ago
Most beautiful🚩
0
0

Select Language
Share Link