Next
‘टीसीएस आयटी विझ’मध्ये अनिकेत आणि अनिरुद्धचे यश
प्रेस रिलीज
Wednesday, October 10, 2018 | 12:37 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या अग्रगण्य आयटी सेवा सल्लागार आणि व्यवसाय सोल्युशन्स फर्मने आयोजित केलेल्या ‘टीसीएस आयटी विझ २०१८’ या भारतातील शालेय मुलांसाठीच्या सर्वांत मोठ्या तंत्रज्ञान प्रश्नमंजुषेत पुण्यातील एका हजारांहून अधिक शाळांनी सहभाग घेतला. चार ऑक्टोबरला कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही स्पर्धा झाली. यात प्रादेशिक अंतिम फेरीतील स्पर्धेच्या पाच फेऱ्यांनंतर बिशप्स शाळेतील अनिकेत सी. आणि अनिरुद्ध देब यांनी विजेतेपद पटकावले.

आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांमध्ये सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञान कौशल्यांच्या वाढत्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही खडतर स्पर्धा वार्षिक ज्ञान स्पर्धेच्या रूपात घेतली जाते. प्रत्येक शाळा दोन-दोन विद्यार्थ्यांचे कितीही संघ यात पाठवू शकते. यासाठी प्रवेश शुल्क नसते. यंदाच्या ‘टीसीएस आयटी विझ’मध्ये टेक ट्रेंड्सचा समावेश होता. अॅनिमेशन सॉफ्टवेअरचा वापर करून गेमिफिकेशनच्या माध्यमातून सादर केलेल्या या टेक ट्रेंडसने प्रेक्षक आणि संघांना जागेवर खिळवून ठेवले. स्पर्धेत मास पर्सनलायझेशन, लेव्हरजिंग इकोसिस्टम्स, क्रिएटिंग एक्स्पोन्शिअल व्हॅल्यू आणि एम्ब्रेसिंग रिस्क या पाच फेऱ्या होत्या. शिवाय ‘tcs@50’ यावर एक विशेष फेरी होती. जगभरात प्रचंड परिणाम घडवू पाहणाऱ्या तंत्रज्ञानातील ट्रेंड्सवर या स्पर्धा व्यासपीठात भर देण्यात आला होता. लिखित प्राथमिक फेरीत निवडून आलेल्या पहिल्या सहा संघांना प्रादेशिक अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला होता.

यंदाच्या प्रादेशिक विजेत्यांनी ६० हजार रुपयांचे गिफ्ट वाउचर्स मिळवले. युडब्लूसी महिंद्रा कॉलेजमधील गौरव राजेश आणि पार्थ शुक्ला या द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना ४० हजार रुपयांच्या गिफ्ट वाउचर्सने सन्मानित करण्यात आले. शिवाय, विजेत्यांना खास डिझाइन करण्यात आलेल्या ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले. अंतिम फेरीतील सहा स्पर्धकांना ‘टीसीएस’तर्फे अनेक बक्षिसे देण्यात आली. यात जीम बॅग, ब्ल्यू-टूथ स्पीकर्ससह मल्टिफंक्शनल म्युझिक टॉर्च, वायरलेस आउटडोअर स्पीकर्स आणि टीसीएस५० पेन ड्राइव्ह यांचा समावेश होता.

हे विजेते पुण्याचे प्रतिनिधीत्व करत भारतभरातील इतर ११ प्रादेशिक विजेत्यांसोबत राष्ट्रीय अंतिम फेरीत स्पर्धेत उतरतील. ‘बार्कलेज युके’चे मुख्य डेटा अधिकारी आणि भारतातील बार्कलेज यूके शेअर्ड टेक्नॉलॉजी आणि टेक कॅप्टिव्ह हेड के. के. गुप्ता, ‘टीसीएस सेंटर हेड सचिन रत्नपारखी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

‘टीसीएस आयटी विझ २०१८’ ही प्रश्नमंजूषा देशातील अहमदाबाद, बेंगळुरु, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पुणे या १२ ठिकाणी घेतली जाणार आहे. ‘टीसीएस बिझनेस ४.० फ्रेमवर्क’वर आधारित पाच फेऱ्या असलेल्या अनोख्या फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा घेतली जाते. यात अॅनिमेशनवर आधारित क्विझ सॉफ्टवेअर आहे. व्यावसायिक सर्किट बझरवर ही स्पर्धा आधारित असल्‍याने प्रत्येक संघाला उत्तर देण्यासाठी समान संधी उपलब्ध होते.

मास पर्सनलायझेशन या फेरीत संघाला एकूण उत्तराचा गाभा सांगितला जातो आणि त्यांना त्यातून उरलेला चौथा भाग शोधायचा असतो. संघांना अतिरिक्त पर्यायही घेता येऊ शकतो; मात्र, त्यासाठी गुण कापले जातात. लेव्हर्जिंग इको सिस्टम्स या दृश्यात्मकतेवर आधारित फेरीत संघांना इतिहास आणि वर्तमान माहितीच्या आधारे संदर्भ शोधण्यास सांगितले जाते.

क्रीएटिंग एक्स्पोन्शिअल व्हॅल्यू या बझर फेरीत समोर असलेल्या सूचनांच्या किंवा क्ल्यूजच्या आधारे संघ विविध पॉईंट्सना जोडत एका समान मुद्दयावर येण्याचा प्रयत्न करतात. अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांसाठी समान प्रश्न असतात; मात्र यात चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण दिले जातात. एम्ब्रेसिंग रिस्क फेरीतील उत्साह, वेग यातून आधुनिक जगात चपळ राहण्याची आवश्यकता दर्शवली जाते. ही अनेक क्ल्यू देणारी फेरी बझरवर खेळली जाते. जसजसा प्रश्न पुढील क्ल्यूवर जाईल, प्रश्नाचे मूल्य कमी होत जाते.

‘टीसीएस’च्या पाच दशकांच्या दैदिप्यमान कामगिरीचा आढावा 'tcs@50' या खास फेरीत घेतला जातो. यात सर्व संघांसाठी चार समान प्रश्न होते आणि चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुणांकन होते. ट्वीपोर्टिंगमध्ये ट्विटर स्पर्धाही होती. पुण्याने दोन हजार ४६४ हून अधिक ट्विट्स अनुभवले. दोन आघाडीच्या ट्विट्सना आणि सर्वोत्कृष्ट 'ट्विट ऑफ द डे'साठी मल्टिफंक्शन टॉर्च आणि ब्ल्यू-टूथ स्पीकर आणि एलईडी नाइट लाइट असलेला स्मार्ट म्युझिक फ्लॉवर पॉट देण्यात आला.

तंत्रज्ञान पर्यावरण, व्यवसाय, व्यक्ती, नवे ट्रेंड्स आणि लिजेंड्स यासह विविध क्षेत्र आणि उद्योगातील माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आयटीने आपला परिणाम दाखवला आहे अशी क्षेत्रे, वेब, शिक्षण, मनोरंजन, पुस्तके, संगीत, सिनेमे, बँकिंग, जाहिरात, क्रीडा, गेमिंग, सोशल मीडिया आणि मोबाइलचे जग, आयटीतील व्यक्तिमत्त्वे, आयटीचे ब्रँड्स आणि कम्युनिकेश कंपन्या, सॉफ्टवेअर उत्पादने, आयटीचा इतिहास तसेच माहिती तंत्रज्ञानाची गमतीशीर बाजू, क्लाउड कम्प्युटिंग, एआय, ऑटोमेशन, बायोमेट्रिक्स, रोबोटिक्स, इंटरनेटचे जग, अनोख्या वेब साइट्स, आयटी बझवर्डस् आणि अॅक्रनीम्ससारखी उदयोन्मुख क्षेत्रे या मुद्द्यांवर स्पर्धेचा मुख्य भर होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search