Next
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
प्रेस रिलीज
Monday, January 28, 2019 | 04:35 PM
15 0 0
Share this story

पुणे : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात ७०वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
 
या वेळी कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनसीसी)कॅडेट्सनी संचलन करून राष्ट्रध्वजला सलामी दिली. विद्यार्थ्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना या वेळी मेडल देऊन गौरवण्यात आलेविद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून युवा स्पदंन, भित्तिपत्रकाचे प्रकाशन, त्याचबरोबर इंग्रजी विभागाचे ‘लँग्वेज लॅब’चे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी  देशभक्तीपर विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले.

या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, अशोक ऊर्फ आप्पा तुपे, मंगेश तुपे, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ यांसह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link