Next
‘ट्रिट’तर्फे बिस्किटे व कूकीजची व्यापक रेंज सादर
प्रेस रिलीज
Monday, June 11, 2018 | 05:26 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘टेस्टी ट्रिट’ या फ्युचर कंझ्युमर लिमिटेडच्या रेडी-टू-इट स्नॅकिंग ब्रॅंडतर्फे स्वादिष्ट बिस्किटे व कूकीजची व्यापक रेंज सादर करत आहे. खाण्यावर प्रेम करणार्‍या आणि आरोग्याच्या बाबतीत दक्ष असलेल्या अशा सर्वांनाच उत्साहित करणार्‍या अनेक पर्यायांचा या नवीन रेंजमध्ये समावेश आहे. चहाचा सदाबहार सोबती मारी बिस्किट, लहान मुलांचे आवडती क्रीम बिस्किटे, चॉकलेटी बॉर्बन, फायबरने संपन्न ओटमील कूकीज आणि आरोग्यदायी डायजेस्टिव्हजचा यात समावेश आहे.

‘टेस्टी ट्रिट’मध्ये चविष्ट डायजेस्टिव्ह बिस्किटेही आहेत. यात चॉकलेट क्रीम असलेली फायबर संपन्न बिस्किटे आहेत. ही डायजेस्टिव्ह क्रीम सक्रिय जीवनशैलीसाठी परिपूर्ण आहे. यामध्ये साखर व ट्रान्स फॅट नाहीत.

‘टेस्टी ट्रिट’ कूकीज चोको चिप्स, बटर कॅश्यूज, पिस्ता, बटर व ओटमील अशा फ्लेवर्समध्ये उपलब्ध आहेत. कुरकुरीत क्रीम बिस्किटांमध्ये स्ट्रॉबेरी, व्हॅनिला व चॉकलेट क्रीम आहेत. टेस्टी ट्रिट बॉर्बन घानामधील सर्वोत्तम कोका बीन्सपासून बनवण्यात आले आहे आणि चॉकलेटी बिस्किटांमध्ये मोठ्या प्रमाणात चॉकलेट क्रीम आहे.

बिस्किटांच्या या रेंजबाबत बोलताना फ्युचर ग्रुपच्या फूड व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव नायक म्हणाले, ‘टेस्टी ट्रिट अल्पोपहार उत्पादनांची व्यापक रेंज देते. ही रेंज सर्व फूडीजसाठी स्वादिष्ट ट्रिट्स आहे. आमच्या बिस्किटे व कूकीजच्या नवीन रेंजमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही आहे. चोको चिप प्रेमींसाठी कूकीज, चहाचा नेहमीचा सोबती मारी बिस्किट आणि आरोग्यदायी डायजेस्टिव्हज यांचा समावेश असलेली ही नवीन रेंज सर्व चवींची पूर्तता करेल. या रेंजमध्ये सर्व मूड्ससाठी बिस्किटे आहेत. तसेच यामध्ये चविष्ट डायजेस्टिव्ह क्रीम देखील आहे, जी आरोग्य व चवीची खात्री देते.’

‘टेस्टी ट्रिट’ बिस्किटे व कूकीजची किंमत पाच रुपयांपासून १५९ रुपयांपर्यंत आहे. ही उत्पादने बिग बझार, बिग बझार जनरेशन नेक्स्ट, फूडहॉल, ईजीडे क्लब, हेरिटेज क्लब, निलगिरीज, हायपरसिटी व निवडक जनरल स्टोअर्समधून खरेदी करता येतील.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search