Next
‘सृजन’च्या खेळाडूंकडून ससूनला चार ‘सक्शन पंप’ भेट
स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांना दिलासा
BOI
Saturday, October 13, 2018 | 05:25 PM
15 0 0
Share this story

‘सृजन क्रिकेट करंडका’च्या खेळाडूंमार्फत ससून रुग्णालयाला चार सक्शन पंप देण्यात आले. या वेळी   डॉ. अजय चंदनवाले, रोहित पवार, धीरज जाधव,  डॉ. संजय तांबे, अजय तावरे यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

पुणे : ‘शहर व जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणारे ‘सक्शन पंप’ ससून रुग्णालयात आल्याने स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. समाजातील विविध दात्यांकडून ससूनला सढळ हाताने मदत होत असल्याने रुग्णालय दिवसेंदिवस अत्याधुनिक होत आहे. हजारो रुग्ण रोज येथे उपचार घेत असून, दुर्मिळातील दुर्मिळ शस्त्रक्रियादेखील येथे होत आहेत. खऱ्या अर्थाने समाजाचे रुग्णालय असा नावलौकिक होत आहे’, असे मत ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद सदस्य आणि ‘सृजन’ संस्थेचे प्रमुख रोहित पवार यांच्या पुढाकारातून ‘सृजन क्रिकेट करंडका’च्या खेळाडूंमार्फत ससून रुग्णालयाला चार सक्शन पंप डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू धीरज जाधव, रोहित पवार, ससूनचे उपअधिष्ठाता डॉ. संजय तांबे, कार्यालयीन अधीक्षक अजय तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन भारती,  संदेश पार्टे, अफजल शेख, पप्पु ढवळे, विशाल कांबळे, आनंद चौहान, कुणाल खोंड, आनंद मोढवे, सुशांत जाधव, चेतन काळंगे, सचिन बर्गे, सागर शिंदे, सागर थरकुडे, राहुल कटके, बबलु पाटील, पप्पु तोडकर, एनसीपी क्रीडा विभागाचे पुणे शहर प्रमुख विपुल मैसूरकर, क्रीडाप्रेमी तेजस देवकाते व कुंडलिक बंडगर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तरुणांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून सृजन व्यासपीठाची निर्मीती रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली असून, कला, क्रिडा, उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील तरुणांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर सृजनचा भर आहे. याच व्यासपीठामार्फत आजवर नाशिक येथे बालमृत्यू रोखण्यासाठी अत्यावश्यक आरोग्य सुविधा, इतर ठिकाणी डिजीटल वजन यंत्र, रुग्णवाहिका, दिव्यांग व्यक्तींना अत्यावश्यक उपकरणे भेट देण्यात आली आहेत.  येत्या ३० ऑक्टोंबरपासून १६ डिसेंबरपर्यंत पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपुर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सृजन क्रिकेट करंडकच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या वेळी  रोहित पवार म्हणाले, ‘युवकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं, संधी निर्माण करणे हा सृजन व्यासपीठाचा मुख्य हेतू असला, तरी आपण आपले सामाजिक कर्तव्य विसरता कामा नये. भविष्यकाळातदेखील सृजनचे खेळाडू सामाजिक उपक्रमांसाठी कटिबद्ध असतील.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link