Next
डॉ. आबनावे यांना उत्कृष्ट वक्ता पुरस्कार
प्रेस रिलीज
Monday, July 23 | 11:12 AM
15 0 0
Share this story

पुणे : ग्लोबल अचिव्हर्स फाउंडेशन या संस्थेकडून दिला जाणारा ‘उत्कृष्ट वक्ता’ (बेस्ट इंटरनॅशनल स्पिकर अॅवॉर्ड) पुरस्कार येथील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांना प्रदान नुकताच करण्यात आला. ताश्कंद (उझबेकिस्थान) येथे झालेल्या सोहळ्यात ताश्कंदचे माजी गव्हर्नर अडोलोट नासिरोरा यांच्या हस्ते मानपत्र, सुवर्णपदक आणि स्मृतिचिन्ह देऊन डॉ. आबनावे यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. विकास आबनावेपाकिस्तान येथे जागतिक सामाजिक परिषदेतील पाच व्याख्याने, नेपाळमधील भारत-नेपाळ राज्यघटना यांवर झालेली दोन व्याख्याने, बिश्किकमध्ये (किरगीस्थान) येथील भारतीय अर्थव्यवस्थेवरील व्याख्यान, व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील जागतिक आरोग्य परिषदेतील व्याख्यान आणि बँकॉक, थायलंड येथील ‘भारतीय संस्कृतीचा साउथ ईस्ट एरियावरील प्रभाव’ या विषयावरील व्याख्यानासह भारतातही सर्व प्रमुख शहरांतील दिलेली व्याख्यानांची दखल घेऊन फाउंडेशनकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

बीजे मेडिकलमधील डिबेटिंग सेक्रेटरी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. आज सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. येत्या काळात पॅरिस (फ्रान्स), रोम (इटली), ओकोहिमा (जपान), तसेच बर्लिन (जर्मनी) येथे जागतिक आरोग्य परिषदेत बीजभाषण देण्यासाठी डॉ. आबनावे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link