Next
तरुणाईशी नाळ जुळलेला ‘युथट्यूब’
‘लागीरं झालं जी’ फेम शिवानी बावकर प्रथमच रुपेरी पडद्यावर
BOI
Tuesday, January 15, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this story


पुणे : आजकालच्या तरुणाईची नाळ ओळखून त्यांचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मराठीत तसे कमीच. दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांनी ती ओळखली. सतत ‘यु-ट्यूब’वर असणाऱ्या तरुणाईला अधोरेखित करणारा त्यांचा ‘युथट्यूब’ हा मराठी चित्रपट येत आहे. विशेष बाब म्हणजे ‘लागीरं झालं जी’ या टिव्ही मालिकेतून सर्वांच्या मनात घर केलेली ‘शितल’ म्हणजेच अभिनेत्री ‘शिवानी बावकर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

शिवानी बावकरशिवानी बावकर या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवत आहे. प्रभुलकर यांच्या मिरॅकल्स अकॅडमीची ती विद्यार्थीनी आहे. येत्या एक फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. प्रमोद प्रभुलकर लिखित-दिग्दर्शित आणि ‘मिरॅकल्स फिल्म्स’ निर्मित ‘युथट्यूब’ हा चित्रपट सध्या तरुणाईची उत्कंठा वाढवणारा ठरत आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरमधून चित्रपटाच्या विषय आणि आशयाची पुरेशी कल्पना येते. आजकालची तरुण मुले, त्यांचे चर्चेचे विषय, त्यांना येणाऱ्या अडचणी, विशेषतः मुलींच्या समस्या, त्यांचा पालकांशी असलेला संवाद या सर्व बाबी अतिशय मोकळेपणाने चित्रपटात मांडल्या आहेत.   

प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकरया चित्रपटाबाबतची आणखी एक विशेष बाब म्हणजे प्रमोद प्रभुलकर आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर संचलित ‘मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमी’चे ३०० विद्यार्थी कलाकार या चित्रपटात असणार आहेत. 'आजची तरुणाई ‘यु-ट्यूब’वर वाढलेली म्हणूनच चित्रपटाचे नाव ‘युथट्यूब’ आणि आजच्या युथची भाषाही ‘युथफूल...’ इंग्रजी मिश्रित म्हणून हे इंग्रजी नाव', अशी यामागची संकल्पना असल्याचे प्रभुलकर यांनी सांगितले आहे. 

‘व्हॉट्स अॅपवरती मिडनाइट चॅटिंग...’ हे या चित्रपटातले प्रदर्शित झालेले पहिले गाणेही तरुणांच्या पसंतीस उतरले आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणे पाहून चित्रपटाबाबतची सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link