Next
‘डीकेटीई’चा कोरियातील विद्यापीठांशी करार
प्रेस रिलीज
Tuesday, November 14 | 03:45 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’ आणि दक्षिण कोरिया येथील विद्यापीठामधील सामंजस्य कराराप्रसंगी प्रा. डॉ. जे. जिन. शीम,  प्रा. डॉ. जे. एच. किम, ‘डीकेटीई’चे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व इतर.


इचलकरंजी :
  डीकेटीई टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूट आणि दक्षिण कोरिया येथील युग्नाम युनिव्हर्सि टीमधील इन्स्टिट्यूट ऑफ क्लीन टेक्नॉलॉजी, तसेच कोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे ‘डीकेटीई’तील विद्यार्थ्यांना दक्षिण कोरिया येथे जाऊन पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता येणार आहे.  

  

जगातील आघाडीच्या ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये या युनिव्हर्सिटीचा उल्लेख होतो. ही संस्था कोरियन मिनिस्ट्रीकडून मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी असून, ४४ देशांतील ३०० विद्यापीठांबरोबर तिने सामंजस्य करार केले आहेत. १९५२ साली स्थापना झालेल्या या युनिव्हर्सिटीमध्ये ७५ देशातील विद्यार्थी विविध क्षेत्रात शिक्षण घेत आहेत.  

‘इन्स्टिट्यूट ऑफ क्लीन टेक्नॉलॉजी’चे प्रा. डॉ. जे. जिन. शीम आणि कोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. जे. एच. किम यांनी ‘डीकेटीई’ला भेट देऊन येथील शैक्षणिक सोयी सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, अद्ययावत लॅबोरेटरीज, लायब्ररी, तसेच  कॉलेजच्या सर्व विभागांची माहिती जाणून घेतली. त्यांनी ‘डीकेटीई’ बरोबर विद्यार्थी कल्याणासाठी करार करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘डीकेटीई’चे संचालक डॉ. पी. व्ही. कडोले यांच्याशी शैक्षणिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करून करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

प्रा. शीम यांनी या क्लीन एनर्जी रिसर्च सेंटरबद्दल माहिती दिली. ही १९४७ मध्ये स्थापन झालेली संस्था असून, येथे सुपर कपॅसिटर, सेन्सर्स, नॅनो टेक्नॉलॉजीसाठी वापरण्यात येणारे मटेरियल याविषयी संशोधन केले जाते.  प्रा. किम यांनी कॉन्नम युनिव्हर्सिटीबददल माहिती दिली.


या कराराअंतर्गत टीचिंग, लर्निंगच्या नवीन पद्धती डिझाइन करणे, रिसर्च, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करणे, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रियल ट्रेनिंग देणे यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. संशोधनाबरोबरच ‘डीकेटीई’तील प्राध्यापक व युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ यांच्यामध्ये विकासाच्या मुद्दयावर विविध संकल्पनांद्वारे विचारांची देवाणघेवाण होईल. विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ क्लीन टेक्नॉलॉजी व कोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांची व्याख्याने, संयुक्त पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविणे, संशोधन पेपर प्रसिद्ध करणे, नवनवीन प्रॉडक्ट्सची निर्मिती, इंटरनॅशनल सेमिनार्स,  कॉन्फरन्स, वर्कशॉप्स राबविणे, तसेच शैक्षणिक माहिती, पब्लिकेशन्सचे आदानप्रदान करणे, तसेच विद्यार्थी प्रकल्पासाठी लॅबोरेटरीज, वर्कशॉप्सचा उपयोग करणे आदी बाबींचा समावेश आहे. 


‘डीकेटीई’चे जगातील अनेक प्रख्यात विद्यापीठे व इंडस्ट्रीजशी सामंजस्य करार झालेले आहेत. याअंतर्गत ‘डीकेटीई’चे विद्यार्थी जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न साकार करीत आहेत.  


दक्षिण कोरिया येथील प्रा. डॉ. शीम व प्रा. डॉ. किम, संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, एस. डी. पाटील, सर्व ट्रस्टी, इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे. डायरेक्टर (प्रशासकीय)  प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डे. डायरेक्टर (शैक्षणिक)  प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व विविध विभागप्रमुख उपस्थित होते. प्रा. ए. व्ही. शहा यांनी को-ऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले. प्रा. एस. डी. गोखले यांनी सूत्रसंचालन केले

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link