Next
‘वक्तृत्वामुळे करिअरलाही नवा आयाम’
राज्यस्तरीय मुख्यमंत्री वक्तृत्व स्पर्धेत पुण्याचा आकाश पाटील प्रथम
BOI
Tuesday, September 04 | 02:51 PM
15 1 0
Share this story

भाजप व जय हो प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह (मागे उभे) तुरुंगाधिकारी अमेय पोतदार, राजू भाटलेकर आणि मान्यवर.

रत्नागिरी : ‘विद्यार्थ्यांनी फक्त बक्षीस मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेऊ नये. वक्तृत्वामुळे तुमच्या करिअरलाही नवा आयाम प्राप्त होतो. तसेच तुम्ही तुमच्या संस्थेचा चेहरा होता,’ असे प्रतिपादन रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंगाधिकारी अमेय पोतदार यांनी केले. भारतीय जनता पक्ष आणि ‘जय हो प्रतिष्ठान’तर्फे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. 

या स्पर्धेत पुण्यातील अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या आकाश पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला. ऋतुजा व्हरकट (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी), राजेश्वरी पाटील (डीबीजे कॉलेज, चिपळूण) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. अपूर्वा नवाथेला (बॅ. नाथ पै कॉलेज, हर्चे, लांजा) उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.

अमेय पोतदार म्हणाले, ‘मीसुद्धा अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यश मिळवले. त्या त्या वेळच्या परिस्थितीवर आधारित विविध विषयांवर बोललो. त्या निमित्ताने अभ्यास झाला. नोकरीच्या संधी दारात उभ्या होत्या. सुरुवातीला डीएनएस बँकेत नोकरी लागली. नंतर परीक्षा दिल्या. तुरुंगाधिकारी पदाच्या मुलाखतीमध्येच माझी निवड घोषित झाली. हे केवळ वक्तृत्वाच्या जोरावरच शक्य झाले. ही संधी वक्तृत्वामुळेच मिळाली.’

रा. भा. शिर्के प्रशालेमध्ये दोन सप्टेंबर २०१८ रोजी पूर्ण दिवसभर ही स्पर्धा झाली. यात ६० जणांनी आपली वक्तृत्वकला सादर केली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केले. बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी विशेष कारागृहाचे तुरुंगाधिकारी अमेय पोतदार, ‘भाजयुमो’चे जिल्हाध्यक्ष राजेश मयेकर, माजी सभापती नीलेश लाड, उपशहराध्यक्ष राजन फाळके, महिला आघाडी अध्यक्ष सुजाता साळवी, शिक्षिका अनन्या धुंदूर, संजय आखाडे, अमित विलणकर, जय हो प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू भाटलेकर, स्पर्धाप्रमुख प्रशांत बोरकर उपस्थित होते.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link