Next
‘विकासासाठी शासन तत्पर’
BOI
Tuesday, May 22 | 03:04 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘दक्षिण सोलापूर तालुक्यातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. पाणीपुरवठा, रस्ते विकास, जलयुक्त शिवार अशा विविध योजनांच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन तत्पर आहे,’ असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

अकोले मंद्रुप येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमीपूजन देशमुख यांच्या हस्ते २० मे रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड, अकोले मंद्रुपच्या सरपंच प्रियांका आसबे, उपसरपंच हणमंत पवार, गुंजेगावचे सरपंच संतोष पवार, पंचायत समिती सदस्य सोनाली कडते, महादेव कमळे यांच्यासह शहाजी पवार, रामप्पा चिवडशेट्टी, बाळासाहेब माने आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘अकोले मंद्रुप हे गाव छोटे असल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते; मात्र सध्याचे महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अकोले मंद्रुपसाठी पेयजल, रस्ते डांबरीकरण, विशेष निधी, जलयुक्त शिवार अशा अनेक योजनांच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनांचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घ्यावा.’

‘अनेकवेळा योजनांची माहिती नसल्याने नागरिक लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे गावच्या सरपंच व उपसरपंचांनी शासकीय योजनांचा अभ्यास सूक्ष्मपणे केला पाहिजे; तसेच गावांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गावाच्या विकासासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची आहे,’ असे देशमुख यांनी सांगितले.

या वेळी देशमुख यांनी विविध शासकीय योजना, कर्जमाफी, खात्यावरील थेट लाभ तसेच परिसरातील विकासकामांची विस्तृत माहिती गावकऱ्यांना दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link