Next
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोंबर २०१९
प्रेस रिलीज
Thursday, August 01, 2019 | 01:13 PM
15 0 0
Share this article:

नवी मुंबई : महाराष्ट्रातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोंबर २०१९ आहे.

ही शिष्यवृत्ती सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता पहिली ते १०वीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या अल्पससंख्याक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी ५०टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा, फक्त इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही. 

पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे, एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्याचा धर्म, कुटुंबाचे उत्पन्न, गुण व टक्केवारी इत्यादी माहिती अचूक भरावी. धर्म, उत्पन्न, गुणपत्रक, आधारकार्ड, आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करावीत. पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थींनीसाठी राखीव आहे. २०१८-१९ मध्ये ही शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि या वर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी २०१९-२० करिता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नुतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल; तसेच एका विद्यार्थ्याने नवीन किंवा नुतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल, तर असे अर्ज बाद ठरवले जातील. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे. नसल्यास पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल, परंतु हे बँक खाते क्रमांक फक्त दोन पाल्यांसाठीच वापरता येईल. 

इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (National Scholarship Portal (NSP 2.0) आणि www.Scholarships.gov.in या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावरसुध्दा अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाच्या संचालकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सुनिल व्ही.मालवदे About 22 Days ago
मला कृपया वरील ई-मेल वर किंवा 9850791141 ह्या वॉटस्अप नंबरवर अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचा फॉर्म व विद्यार्थी व पालकाचे स्वयंघोषीत प्रमाणपत्र पाठवा. 🙏🙏
0
0
Rajkumar Anandrao Thorat About 30 Days ago
Nice information
1
0

Select Language
Share Link
 
Search