Next
सर्कस सर्कस
BOI
Saturday, July 28 | 10:09 AM
15 0 0
Share this story

अलीकडील काळात सर्कस हा प्रकार खूप कमी झाला आहे. आता जत्रा अथवा शाळेच्या सुटीच्या दिवसांतच सर्कस पाहायला मिळते; मात्र सर्कस ही एक निर्भेळ करमणूक असते. शारीरिक कौशल्याचे प्रदर्शन करण्याचा एक खेळ असतो. खरे तर हा एक चित्तथरारक अनुभव असतो. हा अनुभव श्यामला शिरोळकर यांनी या पुस्तकातून आपल्याला करून दिला आहे.

या पुस्तकात त्यांनी भारतीय सर्कशीप्रमाणेच परदेशातील सर्कशींची विस्तृत माहिती दिली आहे. प्रारंभी त्यांनी भारतातील सर्कशीचा इतिहास सांगितला आहे. ऋग्वेद काळातील रथांच्या शर्यतींचा त्या आढावा घेतात. इजिप्तमधील सर्कशीच्या गमतीजमती दुसऱ्या प्रकरणात समजतात. अमेरिकेच्या सर्कशींचा इतिहास विस्ताराने सांगितला आहे. फ्रेंच, रशियन, जर्मन, सर्कशींची माहिती स्वतंत्र प्रकरणांमधून दिली आहे. सर्कशीतील विदूषकाचे महत्त्व आणि अविभाज्य अंग असलेले प्राणीविश्व यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे.

प्रकाशक :
श्री ऐश्वर्यगणेश प्रकाशन
पाने : २८२
किंमत : ४५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link