Next
एजीएल एक्स्लुझिव्ह शोरूमचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, March 19, 2018 | 12:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेड’ (एजीआयए) या भारतातील एका सर्वात मोठ्या टाइल्स कंपनीने पुणे येथे ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम सुरू केले आहे. शोरूमचे उद्घाटन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या हस्ते १७ मार्च रोजी करण्यात आले.

या अठराशे चौरस फूट जागेतील शोरूममध्ये सिरॅमिक वॉल व फ्लोअर टाइल्स, पॉलिश्ड व्हर्टिफाइड टाइल्स, ग्लेझ्ड व्हर्टिफाइड टाइल्स, आउटडोअर व पार्किंग टाइल्स अशी सर्व प्रकारची उत्पादने असतील. पुणे मुंबई महामार्गावर आंबेगाव (बुद्रुक) येथे असलेले, हे महाराष्ट्रातील १९वे ‘एजीएल एक्स्लुझिव्ह’ शोरूम आहे.
 
शोरुमच्या उद्घाटनाला एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडचे संचालक भावेश पटेल व ‘ग्रेस्टेक व्हिजन’चे असोसिएट डायरेक्टर शौनक पटेल तसेच, ग्रेस्टेकचे एव्हीपी राहुल शर्मा, एजीएल टाइल्सचे सिनीअर जीएम विकास खन्ना, ग्रेस्टेकचे जीएम विवेक जैसवाल व सिनीअर आरएसएम सर्वेश द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

एजीआयएलने बाजारातील रिटेल व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आणि भारताच्या कानाकोपऱ्यात सेवा देण्यासाठी धोरण आखले आहे. एशियन ग्रॅनिटोने विविध उत्पादने दर्शवण्याच्या हेतूने जागेच्या उपलब्धतेनुसार निरनिराळी शोरूम सुरू केली आहेत. याविषयी बोलताना, एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडचे सीएमडी कमलेश पटेल म्हणाले, ‘आम्हाला पुणे या महाराष्ट्रातील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरात एजीएल एक्स्लुझिव्ह सुरू करताना अतिशय आनंद होत आहे. विविध डिझाइन व टेक्श्चर असलेली उत्पादने उपलब्ध असल्याने, इंटिरिअर डेकोरेटर्स, आर्किटेक्ट्स व घरमालक आता सजावटीची उत्पादने म्हणून लोकप्रिय ब्रँडेड टाइल्सना पसंती देतात. सतत काहीरी वेगळे व खास शोधणाऱ्या व्यक्तींसाठी एजीएल एक्स्लुझिव्ह शोरूम आवश्यक आहे, असे आम्हाला वाटले. या शोरूमद्वारे, आम्ही या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू, अशी आशा आहे.’
 
एजीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश पटेल म्हणाले, ‘ग्राहकांशी थेट संवाद साधून, कंपनीच्या रिटेल विक्रीमध्ये वाढ करण्याच्या कंपनीच्या धोरणाचा भाग म्हणून शोरूम सुरू करण्यात आली आहेत. कंपनीने येत्या तीन वर्षांत रिटेल विक्रीतील हिस्सा सध्याच्या ३५ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रातील टाइल्स उद्योगामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. एजीआयएलचे महाराष्ट्रात डीलर-सब डीलरचे सक्षम जाळे असून, ते येत्या दोन तीन वर्षांत अनेक पटींनी वाढणार आहे.’
 
एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेड १६ वर्षांच्या अल्प कालावधीत भारतातील एक सर्वात मोठी सिरॅमिक कंपनी म्हणून नावारूपास आली आहे. कंपनीच्या उत्पादनांमध्ये सिरॅमिक फ्लोअर, डिजिटल वॉल, व्हिट्रिफाइड, पार्किंग, प्रोक्लेन, ग्लेझ्ड व्हिट्रिफाइड, आउटडोअर, नॅचरल मार्बल कम्पोझिट व क्वार्ट्झ आदींचा समावेश आहे. 
 
गुजरातमध्ये कंपनीचे नऊ अद्ययावत उत्पादन प्रकल्प आहेत आणि भारतभर दोनशे दहापेक्षा अधिक खास शोरूम आहेत. देशातील सर्व राज्यांमध्ये कंपनीचे डीलर व सब-डीलरचे विशेष मार्केटिंग व वितरण जाळे आहे. कंपनी जगभरातील ५३ देशांना निर्यात करते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link