Next
पिंपरीत ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ प्रदर्शन
प्रेस रिलीज
Monday, May 28, 2018 | 04:28 PM
15 0 0
Share this article:

पुणे : आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर देशांतील पक्ष्यांच्या २०० जाती बघण्याची संधी, तसेच मत्स्य प्रदर्शन, वेगवेगळ्या जातीचे कुत्रे, मांजरी, पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या पक्षी आणि प्राण्यांच्या अनोख्या प्रदर्शनातून पुणेकरांना मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड येथे ३० मे ते तीन जून २०१८ या दरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

किलबिल स्कूलचे संचालक रफिक सौदागर यांच्या संकल्पनेतून आणि सहयोगाने हे प्रदर्शन भरविण्यात येत असून, दिल्ली पब्लिक स्कूल इन असोसिएशन आणि फिरुया डॉट कॉम यांनी हे प्रदर्शन प्रस्तुत केले आहे. यासाठी प्रतिमाणशी ७० ते १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अरकारी टोकन, स्टेलास, असंख्य प्रकारचे आफ्रिकन पोपट, कनूर जातीचे रंगीबेरंगी पक्षी, हाताच्या बोटावर बसणारे लव्ह बर्डस, फिंचेस आणि इतर अनेक प्रकार, सुंदर रंगीत दिसणाऱ्या कोंबड्या (परदेशी) अशा या वैविध्यपूर्ण पक्ष्यांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हा शो असणार आहे.

त्याचबरोबर परदेशी बकऱ्या, गिनिपिग अशाप्रकारे अनेक प्राणी येथे पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक पक्षी आणि प्राण्यांची स्वतःची अशी काही ओळख आहे. त्यांची इत्यंभूत माहिती लिखित स्वरूपात इथे मांडलेली पाहायला मिळेल. त्यांचे मूळ गाव ते त्यांच्या खाण्यापासून इतर सवयींबद्दलची सगळी माहिती प्रदर्शनात दिली जाणार आहे.

या सोबतच मत्स्य प्रदर्शनाचाही आस्वाद लुटता येईल. आजच्या काळात प्लास्टिक खेळणी, प्लास्टिकचे सामान वापरून केलेले सजावटीचे साहित्य मत्स्यालयात वापरू नये, हा संदेश देण्यासाठी पूर्ण खऱ्या झाडांनी सजवलेली सुमारे ३० मत्स्यालये आणि माश्यांच्या १००हून जास्त जाती प्रदर्शनात बघायला मिळतील. समुद्री खाऱ्यापाण्याच्या सुमारे ३० जातीच्या माशांचाही समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे.

त्याशिवाय, शिह्त्झू, ल्हासा अॅप्सो, पेकीग्नीज, ब्रिटीश बुलडॉग, कॉकर स्पॅनीयल, चीहूआहुआ यांसारख्या छोट्या आकाराच्या जातींच्या कुत्र्यांची प्रत्यक्ष माहितीही येथे घेता येणार आहे. तसेच पर्शियन मांजरांच्या दहा ते पंधरा जाती प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

‘कोणतातरी पाळीव प्राणी अथवा पक्षी, मासे घरी घेऊन येणे, हा आजच्या काळातील आवडता छंद बनला आहे; पण त्याला योग्य पद्धतीने सांभाळावे कसे, त्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी कोणत्या, त्याच्या व्याधींविषयी काय, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर पक्षी व प्राण्यांबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ‘वर्ल्ड ऑफ पेट्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे,’ अशी माहिती किलबिल स्कूलचे संचालक सौदागर यांनी दिली.

प्रदर्शनाविषयी :
कालावधी : ३० मे ते ३ जून २०१८
वेळ : सकाळी १० ते रात्री नऊ
स्थळ : कापसे लॉन, कोकणे चौक, रहाटणी, पीसीएमसी, गेट नं. २, पिंपरी-चिंचवड, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search