Next
संपूर्ण पंचतंत्र
BOI
Thursday, May 31, 2018 | 10:11 AM
15 0 0
Share this article:

प्राचीन भारतीय लोककथांचा हा सर्वाधिक लोकप्रिय संग्रह मानला जातो. या संग्रहातील सत्तराहून अधिक लोककथा पाच भागांत विभागल्या आहेत. पंचातंत्रांची रचना शास्त्रविमुख राजपुत्रांना नीतिशास्त्रज्ञ बनविण्यासाठी झाली आहे. मूळ संस्कृतमध्ये असलेल्या या पंचातंत्राचा ह. अ. भावे यांनी केलेला हा अनुवाद आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांची या पुस्तकाला प्रस्तावना आहे.

पंचतंत्राच्या प्रारंभीच कथामुखामध्ये त्याचे रचनाप्रयोजन स्पष्ट केले आहे. या कथांमध्ये मानवेतर प्राणी रूपकस्वरूपात समोर येतात. लबाड कोल्हा, ढोंगी मांजर, हंसी कावळा, घुबड ही सारी मानवाचीच रूपके आहेत. प्राण्यांप्रमाणेच मंत्री आहेत, चांगले मित्र आहेत, चोर आहे नि राजपुत्र-राजकन्याही आहे. या नीतिकथा आहेत. त्यामुळे या नीट वाचल्या, तर आजच्या व्यवहारातही त्या उपयोगी पडतील.

प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : ३४४
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search