Next
साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
प्रेस रिलीज
Friday, June 29 | 02:02 PM
15 0 0
Share this story

शिर्डी : राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना शासकीय समारंभात मानाचे स्थान, समितीच्या मुख्यालयात कार्यालय, दौऱ्यावर असताना शासकीय वाहन व निवास व्यवस्था, मासिक मानधन व विविध भत्ते मिळतील.

हावरे यांनी संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक कार्यावर भर दिला आहे. लोकसहभागातून शिर्डीच्या स्वच्छतेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. शिर्डीला आलेल्या भक्तांनी रक्तदान करावे यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली व त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात राज्यातील विविध रक्तपेढ्या सहभागी झाल्या. राज्यातील हजारो रुग्णांना लाभ झाला.

शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून काम करण्यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम केले आहे. हावरे हे प्रथितयश उद्योजक व बिझनेस लीडर आहेत. त्यांनी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरमधून न्यूक्लिअर इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जीमध्ये २७ वर्षे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ म्हणून काम केले आहे. ते नागपूर विद्यापीठातील इंजिनीअरिंगमधील सुवर्णपदक विजेते आहेत. परवडणारी घरे याविषयी संशोधन करून त्यांनी मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link