Next
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान
BOI
Wednesday, November 21, 2018 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

डॉ. विनायक सोलापूरकरपुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचे हे ३५ वे पुष्प आहे. शुक्रवारी, दि.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजता एस. एम. जोशी सभागृह येथे हे व्याख्यान होणार आहे.

‘चौदाव्या शतकात केरळमध्ये माधवा नामक गणिततज्ज्ञ  होऊन गेले. त्यांनी आणि त्यांच्या परंपरेतील शिष्यांनी निर्माण केलेली संशोधन संपदा थक्क करणारी आहे. भारतात विकसित झालेल्या गणिताच्या इतिहासातील केरळीय गणित एक महत्वाचा; पण उपेक्षित असा अध्याय आहे. त्याचा उलगडा सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. विनायक सोलापूरकर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, सर्वानी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा’, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विनय र. र. यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 91 Days ago
In which language and script were his writings done ? Do they exist .? In which library are they storied ? Have they been deciphered ? Are there people who can read the the originals ?
0
0

Select Language
Share Link
 
Search