Next
‘एअरटेल’चा ग्राहकांसाठी नवीन उपक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 03:33 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारती एअरटेल (एअरटेल) या भारतातील सर्वांत मोठ्या टेलिकम्युनिकेशन सेवा पुरवठादार कंपनीने अधिकाधिक भारतीय ग्राहकांना डिजिटल महामार्गावर चालणे सोपे जावे यासाठी नवीन उपक्रम सादर केला आहे. या उपक्रमाअंतर्गत, एअरटेलच्या टू-जी व थ्री-जी ग्राहकांच्या मोबाईल डिव्हायसेसवर ३०जीबी डेटा मोफत देण्यात येणार असून त्यांना फोर-जी स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्यात येणार आहे. प्रीपेड ग्राहकांना त्यांच्या प्रत्येक रिचार्जवर दर दिवसाला १ जीबी डेटा मोफत देण्यात येत असून पोस्टपेड ग्राहकांनाही त्यांच्या बिल सायकलमध्ये ३० जीबी डेटा (रोलओव्हरसह) मिळणार आहे.

याबाबत बोलताना भारती एअरटेलचे ‘सीएमओ’ वाणी वेंकटेश म्हणाले, ‘फोर-जी स्मार्टफोन्स हे सर्वसामान्य भारतीयांसाठी आता अगदी गरजेचे झाले आहेत. फीचर फोन्स किंवा थ्री-जी फोन वापरणाऱ्यांसाठी फोर-जीवर अपग्रेड होणे हा एक मोठा निर्णय असतो आणि एक दीर्घकालीन गुंतवणूकही. हा उपक्रम सर्वात मोठ्या ग्राहक पुरस्कृत कार्यक्रमांपैकी एक असून, या उपक्रमाद्वारे आमच्या ग्राहकांना फोर-जी ची सेवा अधिक सुलभतेने देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांच्या स्मार्टफोन्सची सर्वोच्च क्षमता अनलॉक करण्याची संधी ग्राहकांना मिळेल. आमचा असा विश्वास आहे की, यामुळे आमच्या लाखो ग्राहकांना फोर-जी स्मार्टफोन्सचा सहज आनंद घेता येणार आहे.’

हा कार्यक्रम ‘एअरटेल’च्या मेरा पहला स्मार्टफोन या उपक्रमास पूरक उपक्रम ठरत असून, या अंतर्गत ‘एअरटेल’तर्फे बहुविध मोबाइल हँडसेट उत्पादकांना किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन्स उपलब्ध करून देण्यासाठी चालना दिली जात आहे; तसेच, फीचर फोन्सच्या मूल्यांकनासाठीही ही सुविधा बाजारात आणण्याचा कंपनी प्रयत्न करीत आहे. संपूर्ण भारतातील ग्राहकांकडून या उपक्रमाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘एअरटेल’ने आधीच सॅमसंग, इंटेक्स, कार्बन, लावा, सेल्कॉन, मोटोरोला, लिनोवो, नोकिया, इंटेल, झेन, कार्बन आणि लीफोन या मोबाईल उत्पादक कंपन्यांशी करार केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, या सर्व स्मार्टफोन्समध्ये आकर्षक रोख परतावा आणि डेटासह विशेष योजना आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा देण्यात आल्या आहेत.

टोल फ्री क्रमांक ५११११ वर फोन करून किंवा माय एअरटेल अॅप्लिकेशनवर कॉल करून ग्राहक आपली पात्रता तपासू शकतात; तसेच मोफत डेटा लाभांचा दावा करू शकतात. क्लेम केल्यापासून २४ तासांच्या आत ३० जीबी मोफत डेटा बेनिफिट दिला जाईल.

अधिक माहितीसाठी : airtel.in/4gupgrade
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link