Next
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
प्रेस रिलीज
Tuesday, November 27 | 03:16 PM
15 0 0
Share this story



पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे (प्रीएम्बल)  भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आझम कँपस येथे २६ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार अध्यक्षस्थानी होते. या वेळी इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संस्थेच्या १० हजार विद्यार्थ्यांसह प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले.



संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, नियामक मंडळाचे सदस्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link