Next
‘जलयुक्त’च्या पुरस्कारांची घोषणा
BOI
Tuesday, November 07, 2017 | 05:56 PM
15 0 0
Share this article:

अमरावती : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यातील पुरस्कारप्राप्त गावे, तालुके, पत्रकारांना आठ नोव्हेंबर रोजी अकोला येथे होणाऱ्या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या पुरस्कारांची माहिती अशी : जिल्हास्तर पुरस्कारप्राप्त गावे– बुलडाणा जिल्हा- येऊलखेड (ता. शेगाव, प्रथम), साखरखेडा (ता. सिंदखेड राजा, द्वितीय), आंबेटाकळी (ता. खामगाव, तृतीय), अटाळी (ता. खामगाव, चतुर्थ), फत्तेपूर (ता. खामगाव, पाचवा). पुरस्कार प्राप्त तालुके- खामगाव (प्रथम), देऊळगाव राजा (द्वितीय).

अकोला जिल्हा (अनुक्रमे)– मोऱ्हळ (ता. बार्शीटाकळी), चिखलगाव (ता. अकोला), मोरगाव सादीजन (ता. बाळापूर), विरहीत (ता. मुर्तीजापूर), नांदखेड (ता. पातूर). पुरस्कारप्राप्त तालुके- बार्शीटाकळी (प्रथम), अकोट (द्वितीय).

वाशिम जिल्हा– साखरा (ता. वाशिम), चांधई (ता. मंगरुळपीर), कोठारी (ता. मंगरुळपीर), एकांबा (ता. मालेगाव), नागठाणा (ता. वाशिम). पुरस्कारप्राप्त तालुके– मानोरा (प्रथम), मंगरूळपीर (द्वितीय).

अमरावती जिल्हा- गव्हाणकुंड (ता. वरुड), टेंभुरखेडा (ता. वरुड), भिवापूर (ता. तिवसा), नेरपिंगळाई (ता. मोर्शी), मार्डी (ता. तिवसा). पुरस्कारप्राप्त तालुके– अमरावती (प्रथम), वरुड (द्वितीय).

यवतमाळ जिल्हा– खंडाळा (ता. आर्णी), पांढुर्णा खु. (ता. घाटंजी), धामणगाव-देव (ता. दारव्हा), उमरी (कापेश्वर) (ता. आर्णी), धुंदी (ता. पुसद). पुरस्कारप्राप्त तालुके– घाटंजी (प्रथम), दिग्रस (द्वितीय).

विभागस्तरीय पुरस्कारप्राप्त गावे– गव्हाणकुंड (ता. वरुड, जि. अमरावती), साखरा (ता. जि. वाशिम). विभागस्तरीय पुरस्कारप्राप्त तालुके– अमरावती (जि. अमरावती), घाटंजी (जि. यवतमाळ). विभागस्तरीय पुरस्कारप्राप्त जिल्हे–अमरावती (प्रथम), बुलडाणा (द्वितीय).

पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये विभागस्तरीय राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार संजय पाखोडे (जि. अमरावती), राजेश शेगोकार (जि. बुलडाणा). संदीप शेंडे (जि. अमरावती).

जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांमध्ये अमरावती जिल्हा (अनुक्रमे)- संजय बनारसे, संजय रोडे, हेमंत निखाडे. अकोला जिल्हा- संतोष येलेकर, रामराव वानरे. बुलडाणा जिल्हा- संजय निकस. वाशिम जिल्हा- मोहन राऊत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search