Next
मर्चंट यांनी क्रेडाई पुणे मेट्रो अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला
प्रेस रिलीज
Monday, April 15, 2019 | 01:02 PM
15 0 0
Share this article:

सुहास मर्चंटपुणे : येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुहास मर्चंट यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठीच्या क्रेडाई पुणे मेट्रो अर्थात ‘कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यांची ही निवड २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी असणार आहे.

पुण्यात हॉटेल कॉनरॅड येथे झालेल्या भव्य सोहळ्यात मर्चंट यांनी मावळते अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी ‘क्रेडाई’चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, ‘क्रेडाई-महाराष्ट्र’चे अध्यक्ष राजीव पारीख आणि ‘क्रेडाई’चे संस्थापक कुमार गेरा आणि रामकुमार राठी आदी उपस्थित होते.

मर्चंट हे ‘क्रेडाई’चे सहसंस्थापक असून, त्यांनी याआधी संस्थेचे मानद सचिवपदही भूषवले आहे. मर्चंट याच्याबरोबरच्या नवीन कार्यकारिणीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रोहित गेरा, अनिल फरांदे, रणजीत नाईकनवरे, किशोर पाटे, मनीश जैन आणि अमर मांजरेकर या सर्वांचा उपाध्यक्ष म्हणून समावेश आहे. कार्यकारिणीत आदित्य जावडेकर (सचिव), आय. पी. इनामदार (खजिनदार) आणि अश्विन त्रिमल (सहसचिव) यांचीही निवड झाली आहे.  

क्रेडाई पुणे मेट्रो ही संस्था याआधी ‘प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे’ या नावाने ओळखली जात असे. त्या काळापासून म्हणजेच १९८७ पासून मर्चंट हे संस्थेशी निगडित आहेत. त्यांनी १९८७ ते १९९९ या कालावधीत संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून, तर १९९९-२००२ या कालावधीत संस्थेचे मानद सचिव म्हणून पद भूषविले. इतकेच नव्हे, तर गेली तब्बल नऊ वर्षे त्यांनी क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मर्चंट यांच्याकडे बांधकाम क्षेत्रातील ४५ वर्षांचा अनुभव आहे. केवळ बांधकामच नव्हे, तर बांधकामाशी संलग्न असलेल्या आरसीसी डिझाइन, एस्टिमेशन, कच्च्या मालाची खरेदी, वास्तूस्थापत्य, व्यवस्थापन, विपणन, कायदेशीर बाबी आणि व्यवसाय वृद्धी या विविध क्षेत्रांची त्यांना उत्तम जाण आहे. सध्या ते कल्पतरू समुहाबरोबर कार्यरत आहेत. मर्चंट हे मूळचे अभियंता असून, आयआयटी पवई येथून त्यांनी एम टेकचे शिक्षण पूर्ण केले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून वाखाणल्या गेलेल्या मर्चंट यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावरही आपले नाव कोरले. रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून ते सामाजिक जीवनातदेखील सक्रिय असतात.   

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यालगतच्या भागातील ४०० हून अधिक बांधकाम व्यावसायिक क्रेडाई पुणे मेट्रोचे सदस्य आहेत. संस्थेची स्थापना १९८२मध्ये झाली. बांधकाम व्यावसायिक, ग्राहक आणि बांधकामविषयक धोरणकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून चर्चा घडवणे, व्यावसायिक व ग्राहकांमधील दुवा म्हणून काम करणे आणि बांधकाम कामगारांना प्रशिक्षित करणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search