Next
अमृता ठोंबरेला कुस्तीमध्ये सुवर्णपदक
BOI
Wednesday, December 12, 2018 | 05:22 PM
15 0 0
Share this article:ठाणे : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) येथील गावदेवी मैदानात सीएम चषक ठाणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात अमृता ठोंबरे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकवर आपले नाव कोरले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्तीसारख्या खेळात एका महिला खेळाडूने मिळवलेल्या या यशाबद्दल अमृताचे कौतुक होत आहे.
 
युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, क्रीडा कौशल्यांचा विकास व्हावा, ऑलम्पिकसारख्या स्पर्धेत जिल्ह्यासह राज्यातील खेळाडूंची संख्या वाढवी आणि खेळाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ‘भाजयुमो’तर्फे राज्यभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचा एक भाग म्हणून ‘भाजयुमो’ ठाणे शहर जिल्हा यांच्यातर्फे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ठाण्यातील कुस्तीगीर भवनची कुस्तीपटू  अमृता ठोंबरे हिने ४३ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत कुस्तीगीर भवनमधील आदित्य ठोंबरे याने रौप्यपदक मिळवले, तर एकूण १२ खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले. कुस्ती प्रशिक्षक विलास बवले, पांडुरंग ठोंबरे  यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी हे यश संपादन केले. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वाघुले, नगरसेवक सुनेशी जोशी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search