Next
‘देशहितासाठी युवकांनी संघटित व्हावे’
शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सोहम सिंग सोलंकी यांचे आवाहन
नागेश शिंदे
Saturday, May 11, 2019 | 11:32 AM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : ‘बजरंग दलाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या बजरंग दल शौर्य प्रशिक्षण शिबिरात युवकांनी देशहितासाठी संघटित व्हावे,’ असे आवाहन अखिल भारतीय बजरंग दलाचे मध्य प्रदेश येथील संयोजक सोहम सिंग सोलंकी यांनी केले. 

बजरंग दलातर्फे शहरातील बालाजी विद्यालय येथे आयोजित निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, आंतराष्ट्रीय महामंत्री विश्व हिंदू परिषद अविनाश देशपांडे, कृष्णा देशमुख, देवगिरी प्रांतमंत्री आनंद पांडे, वाढोणा शिबिर महव्यवस्थाक संतोष गाजेवार या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 

बजरंग दल ही देशभर कार्यरत असलेली संघटना असून, या शिबिराच्या माध्यमातून युवकांचा सहभाग वाढावा आणि त्यातून सशक्त पिढी निर्माण व्हावी, यासाठी हे शिबिर हिमायतनगर शहरात घेण्यात आले. बजरंग दलाच्या माध्यमातून अयोध्या, गोवंश रक्षा, धर्मांतर या विरोधात आवाज उठविण्यात आला आहे. या वर्षी हे प्रशिक्षण शिबिर मोठ्या स्वरूपात घेण्यात येत आले असून, हे शिबिर सात दिवस चालणार असून, यात १७० सवंसेवक सहभागी झाले आहेत. यामध्ये दंडयुक्त (लाठी-काठी), रायफल, नियुद्ध, समता, साहसी, खेळ अशा शारीरिक विषयांचा, तसेच हिंदू समाजातील विविध अनुक्रमे, सामाजिक समरसता, आदर्श कार्यकर्त्ता, शिवरायांची युद्ध नीती, गोरक्षा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चा, वक्तृत्व कला, पथनाट्य, आंदोलने, कथाकथन, वयोवृद्ध लोकांचे रक्षण, महिला मुलींचे रक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हिमायतनगर बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल, किरण बिच्चेवार, बंडूभाऊ अंनगुलवार, शुभम दंडेवाड, अजय बेदरकर, गजानन गायके, सावन रावते, शत्रू हेंद्रे, मंगेश धुमाळे, गणेश रामदीनवार, नागेश शिंदे, शुभम हरडपकर, शीतल सेवनकर, निकू ठाकूर यांसह असंख्य स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search