Next
भीम अॅप
प्रेस रिलीज
Tuesday, January 09 | 03:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने विकसित केलेले क्रांतिकारक अॅप भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजे ‘भीम अॅप’ लाखो भारतीयांच्या पसंतीचा पर्याय ठरले आहे. हे अॅप लोकांना सुविधा देऊ करत असल्याने, लोक त्याचे मोठ्या प्रमाणावर प्रशंसक बनले आहेत.
 
भीम अॅप चोवीस तास काम करत असून, पैसे वापरकर्त्याच्या बँक खात्यात थेट जमा होतात. क्युआर कोड स्कॅन करूनही रक्कम भरता येते. या अॅपचे आणखी एक उपयुक्त वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही भीम अॅप किंवा युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरकर्त्याला निधीसाठी कलेक्ट रिक्वेस्ट पाठवता येते. 

भीम अॅपची शिफारस  तुम्ही मित्र आणि परिवारातील सदस्यांसाठी करू शकता आणि त्याचा फायदा असा आहे की, शिफारस करणारा आणि ज्याला अशी शिफारस केली आहे; त्या दोघांनाही काही विशिष्ट संख्येने व्यवहार पूर्ण केल्यानंतर प्रोत्साहन म्हणून बक्षीस मिळते.
 
कशी काम करते ही योजना?
शिफारस करणाऱ्याने ज्याला शिफारस करायची आहे, त्याला भीम अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि रेफरल कोडमध्ये आपला मोबाईल क्रमांक टाकावा. दोघांनाही त्यांचे बक्षीस मिळण्यासाठी, ज्याला शिफारस केली आहे त्याने किमान ५० रुपयांचे किमान तीन व्यवहार केले पाहिजेत. ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर दोघांनाही प्रत्येकी २५ रुपये बक्षीस मिळतील. 

भीम अॅप विषयी :  
अँड्रॉईड फोन वापरणारे भीम अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतात, तर आय फोन वापरकर्त्यांना ते अॅपल अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे.
एकदा हे अॅप डाऊनलोड केले की, यूपीआय पिन, यूपीआय आय डी तयार करून, या अॅपद्वारे व्यवहार सुरू करता येतात. भीम अॅप अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पैसे झटपट पाठवण्यासाठी आणि मिळवण्यासाठी फोनची संपर्क यादी शोधून, त्यातून ज्यांच्याशी व्यवहार करायचे आहेत त्यांची निवड करता येते.
 
भीम अॅप संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया www.bhimupi.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link