Next
कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन + सत्यम शिवम सुंदरम
BOI
Wednesday, November 21, 2018 | 10:08 AM
15 0 0
Share this story

सीताराम पुरुषोत्तम पटवर्धन उर्फ अप्पा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वच्छ भारताचा वसा जपला. ते महात्मा गांधी यांचे शिष्य होते. अप्पासाहेबांनी चराची स्वच्छतागृहे व शौचालये खणली. तेव्हापासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या कार्याची माहिती प्रा. सतीशचंद्र तोडणकर यांनी ‘कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन’ या चरित्रात दिली आहे. महात्मा गांधी व अप्पासाहेब यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, भूदान व अप्पासाहेबांनी १९५६मध्ये सुचविलेली चलनशुद्धीची योजना अशा अनेक प्रसंगांतून कोकण गांधी यांचे चरित्रकार्य यातून उलगडले आहे. लेखक तोडणकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गोपुरी आश्रमात अप्पासाहेब पटवर्धन यांचा सहवास लाभला. वर्ध्याला पवनार आश्रमात जाऊन त्यांनी विनोबा भावे यांचेही दर्शन घेतले. त्यांच्याप्रमाणेच महात्मा गांधी व पंडित नेहरू यांच्यावरही त्यांची श्रद्धा आहे. या सर्वांचे व्यक्तिमत्त्व त्यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ या पुस्तकातून उलगडले आहे. इंदिरा गांधी, साने गुरुजी, भारतीय संस्कृती, लोकमान्य टिळक यांचे गीतारहस्य, स्कॉटिश मिशनरी अल्फ्रेड गॅडने यांचे हायस्कूल असे अनेक विषय या पुस्तकात मांडले आहेत.

पुस्तके : कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन आणि सत्यम शिवम सुंदरम
लेखक आणि प्रकाशक : प्रा. सतीशचंद्र तोडणकर
पृष्ठे : १९१
मूल्य : २०५ रुपये

(कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन आणि सत्यम शिवम सुंदरम ही पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link