Next
डुरक्या घोणसाला सर्पमित्राकडून जीवदान
प्रशांत सिनकर
Wednesday, October 10, 2018 | 04:13 PM
15 0 0
Share this story

ठाणे : शहरातील पूर्वेकडील सावरकर नगर परिसरात आढळलेल्या तीन फूट लांबीच्या डुरक्या घोणस सापाला सर्पमित्रांनी नुकतेच पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले.

उन्हाच्या काहिलीमुळे आता सरपटणारे प्राणी गारव्याच्या शोधात नागरी वस्तीत आढळून येत आहेत. ठाणे शहराचे तापमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे कमी तापमानात वावरणारा डुरक्या घोणस हा साप गारव्याच्या शोधार्थ बाहेर पडला होता. सावरकर नगर परिसरात हा साप आढळल्यावर रहिवाशांनी सर्पमित्र अनिल कुबल यांना पाचारण केले. भारतात सापाच्या दंशामुळे दगावणाऱ्यांमध्ये घोणसाचा दंश झाल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे डुरक्या घोणस नक्की कोणत्या प्रकारचा आहे, याचा पटकन उलगडा होत नाही. या पार्श्वभूमीवर, अनिल कुबल यांनी हा साप बिनविषारी असल्याचे सांगितले. त्यांनी दगडाआड दडून बसलेल्या या सापाला त्वरित पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.

हा साप बिनविषारी असून, निशाचर असतो. या सापाचे शरीर लठ्ठ असते; मात्र उंदीर-घुशींसारख्या उपद्रवी प्राण्यांना तो चपळाईने भक्ष्य बनवतो. घोणस साप विषारी, तर अजगर अजस्र असला, तरी बिनविषारी. या दोन्ही सापांच्या रंगाचे साधर्म्य असलेल्या डुरक्या घोणस या सापाला पटकन ओळखणे अवघड असते. खडकाळ अथवा भुसभुशीत जमिनीत याचे वास्तव्य असते. जानेवारी ते मार्च हा या सापाचा मीलनाचा काळ आहे. या सापाची लांबी साधारण चार फुटांपर्यंत असून, शरीर एकदम जाडजूड आणि शेपूट आखूड असते.

या सापाच्या शरीरावर गडद तपकिरी डाग असतात. याच्या तोंडावर आणि शेपटीवरील खवले अतिशय खरखरीत असतात. उंदीर, घूस, सरडा या प्राण्यांबरोबरच लहान पक्ष्यांवर झडप घालून हा साप उपजीविका करतो. हा साप निशाचर असल्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळीच हा साप दिसतो. डुरक्या घोणसाची मादी एका वेळी २५ ते ३० पिल्लांना जन्म देत असल्याचे सर्पमित्र कुबल यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link