Next
मासिकपाळीबाबत जागृतीकरता महिलादिनी ‘रन फोर नाईन’
‘रन फोर नाईन’मध्ये सामील होण्याचे अक्षयकुमारचे आवाहन
BOI
Wednesday, February 20, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतात अद्यापही मासिकपाळीबाबत अनेक गैरसमज आहेत. त्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी येत्या आठ मार्च २०१९ रोजी महिलादिनी देशभरातील अनेक शहरांमध्ये ‘रन फोर नाईन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत प्रत्येकाने सहभागी होण्याचे आवाहन अभिनेता अक्षयकुमारने केले आहे. यासाठीचा एक व्हिडिओही त्याने प्रसारित केला आहे. 

या विषयावरील ‘पॅडमॅन’ या चित्रपटात काम केलेल्या अक्षयकुमारने या याबाबत जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून देशभरातील २० पेक्षा अधिक राज्यांमधील अनेक शहरांमध्ये ‘रन फोर नाईन’चे आयोजन करण्यात आले आहे. 

अक्षयकुमार लखनऊमध्ये हिरवा झेंडा दाखवून ‘रन फोर नाईन’चा प्रारंभ करणार आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये होणाऱ्या या ‘रन फोर नाईन’मध्ये नामवंत कलाकारदेखील सहभागी होणार आहेत.

नाईन सॅनिटरी नॅपकीन्स कंपनी, जेसीआय इंडिया आणि फोगसी यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अनेक कंपन्या, संस्था यात सहभागी झाल्या आहेत. 

या उपक्रमाद्वारे एका दिवसात सर्वाधिक जनजागृती फेऱ्या काढून गिनीज बुकमध्ये विक्रमही नोंदविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नावनोंदणी सुरू झाली असून, जास्तीत जास्त लोकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन अक्षयकुमारने केले आहे.

(अक्षयकुमारचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)  

नावनोंदणीसाठी : http://www.niine.com/run4niine/
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link