Next
‘मेरिटाइम’तर्फे ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, June 27, 2018 | 12:27 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘भारतात महत्त्वपूर्ण असलेल्या सागरी क्षेत्राची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि याचा उपयोग भारतीय उपखंडातील सागरी क्षेत्रात सुरक्षित व शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने येथील मेरिटाइम रिसर्च सेंटरतर्फे ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ या समर इंटर्नशिपच्या अभ्यासक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आहे,’ अशी माहिती मेरिटाइम रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. (कमांडर) अर्नब दास यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, विज्ञान भारती यांच्या सहकार्याने मेरिटाईम रिसर्च सेंटरतर्फे या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, हा अभ्यासक्रम केवळ बी.टेक आणि एम.टेक या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सहा आठवड्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.

भारतीय उपखंडातील सागरी क्षेत्रात शाश्वत विकास व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारकडून सेफ्टी अॅंड ग्रोथ फॉर ऑल इन दी रिजन (SAGAR) या उपक्रमाअंतर्गत याच व्हिजनच्या माध्यमातून देशातील युवकांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेंटरतर्फे हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.     

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ‘अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस’ या विषयाशी संबंधित ज्ञानाबरोबर डाटा सायन्स, अॅकॉस्टिक्स, सिग्नल प्रोसेसिंग, पॉलिसी मॅटर्स, जिओपॉलिटीक्स, बायोडायव्हरसिटी यांसारख्या विषयांची माहिती घेता येणार आहे. याबरोबरच सागरी क्षेत्र व त्याच्याशी संबंधित अनेक क्षेत्र या विषयातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी देखील या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दोन आठवड्यांच्या गोवा फिल्ड व्हिजिटच्या माध्यमातून प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र संस्थेतर्फे देण्यात येईल.            

मेरिटाइम रिसर्च सेंटरची स्थापना फेब्रुवारी २०१७मध्ये झाली असून, सागरविषयक संशोधनाला (रिसर्च इन मेरिटाइम डोमेन) पाठबळ देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. इंडियन मेरिटाइम फाउंडेशनचे सागरविषयक संग्रहालय व ग्रंथालयही आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link