Next
मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट
BOI
Monday, January 29 | 05:31 PM
15 0 0
Share this story

बाभूळगाव (पंढरपूर) : येथील श्री नागनाथ मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थांना सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांनी सामुहिक श्रवण यंत्र भेट दिले. त्याप्रसगी चित्रसेन पात्रूटकर, किशोर महामुनी, पोपट भोसले, जनार्थन काकडे, बाळासाहेब भोसले, मधूकर गुंजाळ, डॅ. हनुमंत खपसोलापूर : मूकबधिर विद्यार्थ्यांना वाचासिद्धीसाठी रोपळे (पंढरपूर) येथील सुप्रभात ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामूहिक श्रवण यंत्र भेट दिले.
 
येथील सुप्रभात ग्रुपतर्फे नेहमीच विधायक कामाला प्राधान्य दिले जाते. बाभूळगावातील मूकबधिर विद्यालयाला सामूहिक श्रवण यंत्राची गरज होती. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत; मात्र या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. रोपळेतील सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांना विद्यालयाची या यंत्राची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्वतः आर्थिक भार उचलून हे यंत्र खरेदी केले.

याकामी निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ यांनी पुढाकार घेतला. त्यांना सुप्रभात ग्रुपचे अध्यक्ष नागनाथ माळी, मोहन काळे, दादा कदम, डॉ. महावीर शहा, डॉ. हनुमंत खपाले, पोपट भोसले, दत्तात्रय भोसले, बाळासाहेब भोसले, किशोर महामुनी, जनार्धन काकडे, संजय कुलकर्णी यांनी साथ दिली.

‘या सामूहिक श्रवण यंत्रामुळे मूकबधिर विद्यार्थांना वर्गात शिकवताना ऐकू येण्यास मदत होणार आहे. ऐकू येणारी मुले हळू-हळू बोलायलाही शिकतील,’ असा विश्वास मुख्याध्यापक चित्रसेन पाथरूट यांनी सांगितले.

या श्रवण यंत्राचे उद्घाटन जनार्धन काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तानाजी कुंभार, मधुकर भोसले, अर्जुन नंदूरे, महादेव खरसडे, सुनील गुज्जलवार आदींनी प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jodh Vandana Balasaheb About 350 Days ago
Thanks a lot of bytes of India
0
0
वंदना बबनराव जाधव About 350 Days ago
खुप खुप धन्यवाद आमच्या विद्यार्थांचे व शिक्षकांचे कौतुक केल्याबद्दल
0
0
जावव वंदना बबनराव About 350 Days ago
खुप खुप धन्यवाद आमच्या विद्यार्थांचे व शिक्षकांचे कौतुक केल्याबद्दल
1
0
Mallinath Patane sir karmala About 350 Days ago
Congratulations sir for all stops
0
0
chitrasen Pathrut About 350 Days ago
अतिशय सुंदर बातमी सर्व कर्मचारी यांचे उत्साह वाढवणारी आहे. धन्यवाद
0
0
Balasaheb Bhosale About 355 Days ago
धन्यवाद ! बाईटस ऑफ इंडिया टीम प्रेरणा देणारी बातमी आहे
1
0

Select Language
Share Link