Next
डॉ. पूनावाला यांना ‘ऑक्सफर्ड’ची मानद पदवी प्रदान
प्रेस रिलीज
Monday, July 01, 2019 | 12:27 PM
15 0 0
Share this article:


पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची ‘डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा’ ही मानद पदवी २६ जून २०१९ रोजी आयोजित एका समारंभात प्रदान करण्यात आली आहे. यामुळे जागतिक स्तरावर लसीकरण आणि त्या माध्यमातून रोगनिर्मूलन यासाठी सातत्याने कार्य करणार्‍या आणि विविध स्तरांवर दिशादर्शक सामाजिक कार्य करणार्‍या डॉ. पूनावाला यांच्या शिरपेचात हा सम्मान म्हणजे आणखी एक मानाचा तुरा ठरला.

वॅक्सिन्सच्या क्षेत्रात डॉ. एडवर्ड जेंनर यांना १८१३ साली या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर डॉ. पूनावाला हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील आघाडीची बायोटेक कंपनी असून, तिची स्थापना १९६६ मध्ये झाली. ही कंपनी विविध आजारांवरील उपाय ठरणार्‍या जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी (डोसांच्या संख्येनुसार) जगातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. जगभरातील ३० दशलक्षांहून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलांना जीवरक्षक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.

डॉ. पूनावाला हे अतिशय दानशूर समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असून, आर्थिकदृष्टया दुर्बल सामाजिक वर्गासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जीएव्हीआय या व्हॅक्सिन अलायन्सतर्फे त्यांचा नुकताच ‘व्हॅक्सिन हिरो’ या पुरस्काराने गौरव करण्यात आला होता; तसेच, लसीकरणाच्या क्षेत्रातील त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल डॉ. पूनावाला यांना मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातर्फे गेल्या वर्षी ‘डॉक्टर ऑफ ह्युमेन लेटर्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search