Next
पुण्यासाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर
प्रभात
Wednesday, February 08, 2017 | 03:54 PM
15 0 0
Share this article:



पुणे : पुण्यात आज शिवसेनेचा वचननामा जाहीर करण्यात आला. 162 जागांसाठी शिवसेनेचे 156 उमेदवार रिंगणात दाखल झाले आहेत. यातील 149 उमेदवार हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर 7 जण पुरस्कृत उमेदवार आहेत. उल्लेखनीय म्हणजे पुण्यात शिवसेनेने सर्वांत जास्त उमेदवार दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी इथली लढाईदेखील मुंबईप्रमाणेच होणार असल्याचे दिसत आहे.

शिवसेनेच्या वचननाम्यातील काही मुद्दे...

* रस्ते विकास करणार, उड्डाणपूल उभारणार

* रिंग रोड विक्रमी वेळेत पूर्ण करणार

* मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र कक्ष स्थापणार

* पीएमपीलचा प्रवास येत्या 5 वर्षांत मोफत करणार

* 1500 नविन बसेसची खरेदी करणार

* पारदर्शक कारभारासाठी ई - गव्हर्नन्सवर भर देणार

* संपूर्ण शहराला 24 तास समान पाणी पुरवठा करणार

* गरिबांना मोफत उपचारांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना राबवणार

* स्वतंत्र कंपनी स्थापन करून झोपडपट्टी पुनर्वसन करणार

* झोपडपट्टीवासियांचे सेवा शुल्क माफ करणार

* पुणे शहर प्लास्टिकमुक्त करणार

* प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार

* शिक्षण मंडळाच्या शाळांचा दर्जा सुधारणार

* ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषधे देणार

* राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेद्वारे महिलांना रोजगार

* महिलांना सुरक्षा देणार

* युवकांना रोजगार देणार

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search