Next
बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे सतर्कता सप्ताहाचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, November 01 | 12:58 PM
15 0 0
Share this story

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये केंद्रीय सतर्कता कमिशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार,२९ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान ‘सतर्कता सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. बँकेच्या सर्व शाखा, विभागीय कार्यालये आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे या सप्ताह राबवण्यात येत आहे. यानिमित्त बँकेच्या पुणे पूर्व विभागीय कार्यालयातील या सप्ताहाचा शुभारंभ महापौर मुक्ता टिळक यांनी ‘ऑन लाइन प्रतिज्ञा’ घेऊन केला. उपस्थितांनाही त्यांनी सतर्कता प्रतिज्ञा दिली. 

या वेळी विभागीय प्रमुख श्री. मणीयार म्हणाले, ‘प्रत्येक नागरिकाने शपथेप्रमाणे वर्तणूक करून भारताला भ्रष्टाचार मुक्त करायला हवे.’ 
बँक कर्मचाऱ्यांसह आय. पी. सक्सेना अकादमीचे प्रशिक्षणार्थी या वेळी उपस्थित होते.   

या सप्ताहामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन करण्याच्या व्यापक कार्यात जनसामान्यांना सामील करण्यासाठी बँकेद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीच्या कार्यासाठी सर्वसामान्यांच्या प्रबोधनाकरिता नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी,तसेच बँक कर्मचारी यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी वेबसाईटद्वारे ‘ऑन लाईन प्रतिज्ञा’ घेत आहेत. सप्ताहाचा समारोप तीन नोव्हेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link