Next
‘महाबँके’तर्फे स्वच्छता पंधरवडा
प्रेस रिलीज
Thursday, February 01 | 03:37 PM
15 0 0
Share this story

‘स्वच्छ भारत’ अभियानामधील ‘स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता मोहिमेदरम्यान उपस्थित बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि कार्यकारी संचालक ए. सी. राऊत.

पुणे : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्रनी आपल्या देशभरातील महत्वाच्या शाखां आणि प्रशासकीय कार्यालयाद्वारे स्वच्छतेची मोहीम आयोजित केली. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता आणि ए. सी. राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले होते.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मराठे म्हणाले, ‘आम्हास विश्वास वाटतो की, आमच्या बँकेचे राज्यामध्ये सर्वाधिक शाखांचे जाळे आहेत आणि त्या माध्यमातून स्वच्छता आणि दीर्घकालीन आरोग्यदायी पर्यावरण संदर्भात जागरूकता आणणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हाती घेत असलेल्या पुढाकाराने सामान्यजनांवर दीर्घ आणि चिरस्थायी ठसा उमटेल.’

‘लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील शाखांद्वारे विविध उपक्रम राबवण्यात आले. बँकेनी दिल्ली येथे ‘स्वच्छता रॅली’, पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये हिंदी आणि मराठी भाषेतील पथनाट्य, तर रायपूरमध्ये उद्यान स्वच्छतेचे कार्य हाती घेण्यात आले. याशिवाय बँकेने एका लघु चित्रफितीची निर्मिती केली असून, ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये या चित्रफितीचे प्रदर्शन होणार आहे. स्वच्छतेविषयी ‘स्वच्छता पंधरवड्यादरम्यान नागरिकांमध्ये संवेदनशीलता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वच्छता मोहिमेस अधिक व्यापकता येण्याच्या जनजागृतीच्या दृष्टीने बँकेतर्फे ऑटोरिक्षांवर पोस्टर्स लावली आहेत,’ असे मराठे यांनी सांगितले.

‘शारीरिक स्वच्छता पुरेशी नसून स्वच्छता ही मनापासून आली पाहिजे. दृश्य स्वरूपाद्वारे पोहोचवलेला संदेश लोकांवर दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. दैनंदिन स्वच्छंता राखण्याच्या आणि स्वच्छ राहण्याच्या सवयींमुळे व्यवसायाच्या ठिकाणी आणि जनसमूहाच्या ठिकाणी आरोग्यदायी पर्यावरण राहू शकेल. आम्ही आमच्या पूर्ण संसाधनांसहित ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्याचे ठरवले आहे,’ असे ते म्हणाले.

स्वच्छ भारत’ अभियानंतर्गत १६ ते ३१ जानेवारी २०१८ या कालावधीत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन बँकेतर्फे करण्यात आले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link