Next
‘महिंद्रा’चा सर्वात नवा सस्टेनेबेल लक्झरी कार ब्रँड
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 02:23 PM
15 0 0
Share this article:रोम : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या १९ अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने ऑटोमोबिली पिनिनफरिना हा जगातील सर्वात नवा सस्टेनेबल लक्झरी कार ब्रँड दाखल केल्याचे नुकतेच जाहीर केले.

‘महिंद्रा’ने प्रमोट केलेली ऑटोमोबिली पिनिनफरिना युरोपमध्ये असेल. कंपनी जगातील अतिशय चोखंदळ ग्राहकांसाठी उच्च तंत्रज्ञान, कमालीची कामगिरी, लक्झरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स यांचे डिझाइन, इंजिनीअरिंग व उत्पादन करणार आहे.

पिनिनफरिनाची प्रसिद्ध ऑटोमोटिव्ह डिझाइन क्षमता आणि फॉर्म्युला ई-इलेक्ट्रिक रेसिंग कार चँपियनशिपमध्ये मिळालेले ‘महिंद्रा’चे इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) क्षेत्रातील वाढते कौशल्य यांची सांगड ऑटोमोबिली पिनिनफरिना घालणार आहे. ऑटोमोबिली पिनिनफरिनाने ‘पिनिनफरिना’ इलेक्ट्रिक हायपरकार हे पहिले मॉडेल २०२०मध्ये दाखल करायचे नियोजन केले आहे.

‘पिनिनफरिना ‘एसपीएचे अध्यक्ष पाओलो पिनिनफरिना यांनी सांगितले, ‘भविष्यात आम्ही ज्यांच्यासाठी कार डिझाइन करणार आहोत, अशा प्रतिष्ठित कार कंपन्यांच्या यादीत समाविष्ट होत, ‘पिनिनफरिना एसपीए’साठी अतिरिक्त ग्राहकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ऑटोमोबिली पिनिनफरिना या नव्या कंपनीचे स्वागत आहे. या प्रकल्पामुळे मला व माझ्या कुटुंबियांना माझ्या आजोबांचे रस्त्यावर केवळ पिनिनफरिना ब्रँडच्या कार दिसण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होणार आहे.’

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा म्हणाले, ‘इटलीतील नामवंत डिझाइन तज्ज्ञ खऱ्या अर्थाने सुंदर व खास शैली असलेले डिझाइन तयार करतात. पिनिनफरिनाचा सौंदर्यविषयक वारसा व डिझाइन विचारात घेता, केवळ मोजक्या जणांकडेच असतील, अशी संग्राहक व दुर्मिळ डिझाइन आम्ही विकसित करणार आहोत. हे उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेले नावीन्यपूर्ण व प्रवर्तक उत्पादन असेल. महिंद्रा समूहाची इलेक्ट्रिक वाहनांवर मोठी भिस्त आहे. भविष्यामध्ये ही वाहने महत्त्वाची असणार आहेत आणि ताकद, सौंदर्य व हाय एंड ‘ईव्ही’ तंत्रज्ञान एका कारमध्ये एकत्र आल्यास ते आदर्श लक्झरी वाहन असेल व ते कारप्रेमींना पर्यावरणावर विपरित परिणाम न करता फिरण्याचे स्वातंत्र्य देईल.’

‘महिंद्रा’चे व्यवस्थापकीय संचालक व महिंद्रा रेसिंगचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांनी सांगितले, ‘फॉर्म्युला ई-रेसिंगमध्ये आम्ही सध्या कन्स्ट्रक्टर्सच्या चॅम्पिअनशिपमध्ये व ड्रायव्हर्सच्या चँपियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानी असून, या सहभाहामुळे ‘महिंद्रा’चे ‘ईव्ही’ क्षेत्रातील वाढते कौशल्य विचारात घेता, आम्ही अचूक वेळी ऑटोमोबिली पिनिनफरिना दाखल करत आहोत, असे वाटते आणि पिनिनफरिनाच्या डिझाइन कौशल्यामुळे आम्हाला स्टायलिश, उत्तम कामिरी करणारी इलेक्ट्रिक वाहने जागतिक बाजारात दाखल करणे शक्य होईल.’

मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ऑटोमोबिली पिनिनफरिनाचे नेतृत्व मिशेल पर्श्क करणार आहेत. मिशेल यांना प्रीमिअम जर्मन ब्रँडबरोबर काम करण्याचा अंदाजे २५ वर्षांचा अनुभव असून, त्यांनी मुख्यालय संचालक स्तरावर आणि अन्य पदांवरही काम केले आहे. ते ऑडीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते व २०१० ते २०१३ या कालावधीत फोल्क्सवॅगन ग्रुप सेल्स इंडियाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य होते. ऑटोमोबिली पिनिनफरिनासाठी धोरण आखण्यामध्ये मिशेल महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. पेर स्वांतेसन चीफ ऑपरेटिंग ऑफिसर असणार आहेत. पेर यांना समृद्ध अनुभव असून, त्यांनी व्होल्व्हो समूह व ‘एनईव्हीएस’ याबरोबर काम केले आहे.

ऑटोमोबिली पिनिनफरिनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिशेल पर्श्क म्हणाले, ‘आघाडीचा सस्टेनेबल लक्झरी ब्रँड म्हणून ऑटोमोबिली पिनिनफरिना ब्रँड प्रस्थापित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे व यामुळे आमचे स्वप्न साकार होणार आहे. यामध्ये, वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनची 88 वर्षांची परंपरा आणि महिंद्रा समूह व महिंद्रा फॉर्म्युला ई-रेसिंग यांची आधुनिक इलेक्ट्रिक वाहनाची क्षमता यांची सांगड घातली जाईल. हा मेळ अतिशय प्रभावशाली आहे. ऑटोमोबिली पिनिनफरिनाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा आमचा सन्मान आहे आणि डिझाइनची परंपरा, घटक व उच्च कामगिरी असणारे शाश्वत ‘ईव्ही’ तंत्रज्ञान यांना महत्त्व देणाऱ्या समूहाने नावाजलेला प्रतिष्ठित व इच्छित ब्रँड निर्माण करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search