Next
धूम्रपान सोडण्यासाठी ‘निकोटेक्‍स’तर्फे प्रोत्साहनपर मोहीम
प्रेस रिलीज
Thursday, June 07, 2018 | 04:42 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ‘निकोटेक्‍स’ या धूम्रपान विरोधी विभागातील आघाडीच्‍या ब्रॅंडने ‘#EkCigaretteKam’ ही मोहीम सुरू केली आहे. धूम्रपान करणाऱ्या व्‍यक्‍तींनी एकावेळी एक सिगारेट सोडावी, यासाठी  या मोहिमेच्‍या माध्‍यमातून प्रोत्‍साहित केले जाणार आहे. या मोहिमेचा भाग म्‍हणून ‘निकोटेक्‍स’ने धूम्रपान करणाऱ्या व्‍यक्‍तींना विविध माध्‍यमांतून आरोग्‍यदायी जीवनशैलीच्‍या दिशेने पहिले पाऊल उचलण्‍याचे आवाहन केले.

‘हम में है दम, रोज एक सिगरेट कम’ हे गाणे प्रदर्शित करत २९ मे २०१८ रोजी ही मोहीम अधिकृतरित्‍या सुरू करण्‍यात आली. एखाद्या धूम्रपान विरोधी ब्रॅंडने भारतात विविध भाषांमध्‍ये ऑडिओ लाँच केल्‍याची ही पहिलीच वेळ आहे. आजच्‍या संस्‍कृतीला सादर करत हा ब्रॅंड मजेशीर संगीताच्‍या माध्‍यमातून धूम्रपान करणाऱ्या प्रेक्षकांना हळूहळू लहान-लहान पावले उचलत धूम्रपानाची सवय सोडण्‍याचे आणि एकावेळी एक सिगारेट कमी करण्याचे आवाहन करर आहे. लोकप्रिय संगीतकार हनिफ शेख यांनी संगीतबद्ध केलेले व गायलेले आणि विविध भाषांमध्‍ये रिलीज केलेले गाणे लोकांपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

या गाण्‍याच्‍या सादरीकरणाबाबत बोलताना संगीतकार संगीत दिग्‍दर्शक हनिफ शेख म्‍हणाले, ‘निकोटेक्‍सने सुरू केलेली ही सर्वोत्तम मोहीम आहे. मला त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याचा आनंद झाला आहे आणि महत्त्वाचे म्‍हणजे अशा थोर कार्यासाठी सहयोगी असण्‍याच्‍या समाधानाबाबत सांगण्‍यासाठी माझ्याकडे शब्‍दच नाहीत. आजच्‍या समाजाला एक उत्तम ठिकाण बनवण्‍यासोबतच आरोग्‍यदायी जीवनशैलींना चालना देण्‍यामध्‍ये हातभार लावण्‍याची माझ्यासाठी ही एक उत्‍तम संधी आहे, असे मानतो.’

अंशुल मिश्राया मोहिमेव्‍यतिरिक्‍त देशातील विविध वैद्यकीय क्लिनिक्‍स व कंपन्‍यांमध्‍ये ‘धूम्रपान सोडा’ शिबिरे देखील आयोजित करण्‍यात आली आहेत. देशभरात अशा ३५०हून अधिक शिबिरांचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये आग्रा, अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्‍ली, गोवा, मुंबई, कोलकाता व चेन्‍नई येथील शिबिरांचा समावेश आहे.

या शिबिरांमध्‍ये ब्रेथ अॅनालायझर चाचण्‍या केल्‍या जातात. या चाचण्‍यांच्‍या माध्‍यमातून धूम्रपान करणाऱ्या व्‍यक्‍तींना धूम्रपानामुळे त्‍यांच्‍या शरीरावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव करून दिली जाते. तंबाखू सेवनाला विरोध करण्‍यासाठी क्लिनिकमध्‍ये आलेल्‍या व्‍यक्‍तींना निकोटेक्‍स नमुने देखील वाटण्‍यात येतात.

या उपक्रमाबाबत बोलताना सिप्‍ला हेल्‍थ लिमिटेडच्या विभागीय संचालक अंशुल मिश्रा म्‍हणाल्या, ‘शुभचितंकांची टीम म्‍हणून आम्‍ही धूम्रपान करणाऱ्या व्‍यक्‍तींना धूम्रपान करण्‍याची सवय सोडण्‍याच्‍या दिशेने पाऊल उचलण्‍यास मदत करण्‍याचा प्रयत्‍न करतो. आमच्‍या ‘#EkCigaretteKam’ या मोहिमेच्‍या माध्‍यमातून आम्‍ही धूम्रपान करणाऱ्या व्‍यक्‍तींना सांगू इच्छितो की आम्‍हाला माहीत आहे धूम्रपान करण्‍याची सवय सोडणे अत्‍यंत कठीण आहे; पण लहान-लहान पावले उचलून एकावेळी एक सिगारेट कमी ओढण्याची सवय कमी केल्‍याने त्‍यांना जीवनामध्‍ये दीर्घकाळापर्यंत लाभ होऊ शकतो. ही एक हळुवार प्रक्रिया आहे आणि म्‍हणूनच आम्‍ही या प्रवासामध्‍ये त्‍यांचा विश्‍वसनीय सल्‍लागार व मित्र म्‍हणून त्‍यांचे सहयोगी बनण्‍याचा प्रयत्‍न करतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search