Next
‘मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार?’
प्रेस रिलीज
Wednesday, March 21 | 11:56 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘शिक्षणमंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचे आश्वासक विधान केले. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे सांगून सहा महिने उलटले, परंतु अद्याप मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नाही. सरकारने काय प्रयत्न केले, दिल्ली विद्यापीठाने मराठी भाषेत घेतलेल्या परीक्षेत विदयार्थ्यांचे कमी गुण का आले आहेत याचा जाब विचारला गेला का? हे सभागृहाला सांगावे,’ अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी १६ मार्च रोजी केली.

‘महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या लोककला आणि वाद्यांच्या संवर्धनासाठी, ७५ लाखांची तरतूद सरकारने मागील अर्थसंकल्पात केली होती.  सन २०१४-१५मध्ये सरकारने यावर जवळजवळ २० लाख रुपये खर्च केले आहेत. हा निधी मार्गी लागला की नाही, याचा हिशोब सरकारने दयावा,’ असेही जयंत पाटील म्हणाले.
 
‘दोन लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पैसे बाकी आहे. सरकारने ते पैसे दिले नाही. पुण्याचे सिंहगड इन्स्टिट्यूट त्यामुळे बंद करण्याची वेळ आली आहे. यामध्ये दिरंगाई का झाली? झारीतील शुक्राचार्य कोण आहे? याची चौकशी करावी,’ अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. 

‘जलसंधारण विभागात मोठा गैरव्यवहार होत आहे. या खात्याच्या कामाला जर गती द्यायची असेल आणि दिशा दयायची असेल तर ज्या तक्रारी येतात त्याचे योग्य निवारण करणे गरजेचे आहे,’ असे सांगून किल्ले मच्छिंद्र गडाच्या परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी सरकारने निधी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link