Next
‘थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स’मधून साकारली शिवसृष्टी
प्रेस रिलीज
Tuesday, April 17, 2018 | 02:35 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘कापड, रेशीम, जर, विविध प्रकारचे खरे दागिने, मोती , मणी व टिकल्या यांचा अतिशय कलाकुसरीने वापर करुन डॉ. ज्योती बडे यांनी शिवशाहीतले अनेक प्रसंग ‘थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट’मधून जिवंत केले आहेत. यातून  शिवसृष्टीची अनुभूती येत आहे. शिवकालीन प्रसंगातील बारकावे टिपत साकारलेले हे चित्र प्रदर्शन आवर्जून पाहावे असेच आहे,’ असे प्रतिपादन सरदार शितोळे यांचे वंशज सरदार शिवराजराजे शितोळे यांनी केले.

इचलकरंजी येथील थ्रीडी कोलाज पोर्ट्रेट्स आर्टिस्ट डॉ. ज्योती दशावतार बडे यांनी साकारलेल्या पोर्ट्रेट्सचे प्रदर्शन येथील ‘शिवाजी ट्रेल’ या संस्थेच्या वतीने घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सरदार शितोळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी   डॉ. ज्योती बडे, शिवाजी ट्रेल संस्थेचे मिलिंद क्षीरसागर, मुकुंद उत्पात, संजय लाहोटी, प्रवीण परुळेकर, डॉ. दशावतार बडे आदी मान्यवर उपस्थित होते.

येत्या गुरुवारपर्यंत (दि.१९) घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे रोज सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येईल. 

डॉ. ज्योती बडे यांनी विविध शिवकालीन १४ प्रसंग भव्य पोर्ट्रेट्सच्या माध्यमातून साकारले आहेत. त्यामध्ये जिजाऊंचे डोहाळे, शिवाजी महाराजांचे बारसे, सोन्याचा नांगर, अफजलखानाचा वध, शिवराज्याभिषेक, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका आदी प्रसंगांचा समावेश आहे.

ही त्रिमितीय पोर्ट्रेट्स असून यात रंगांचा अगदी अल्प वापर आहे. प्रत्येक पोर्ट्रेट फ्रेम करताना त्रिमितीय परिणाम साधण्यासाठी नऊ इंच इतकी खोली दिल्यामुळे पोस्टर पाठीमागून पुढे टप्प्या टप्प्याने पुढे घेतली गेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचा पोशाख, फेटे, दागदागिने वास्तवातील वापरले असल्याने चित्रांना जिवंतपणा आला आहे. यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, इतिहास संशोधक डॉ. अमर आडके, संभाजी भिडे गुरुजी यांनीही या पोर्ट्रेट्सची प्रशंसा केली आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link