Next
राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण
‘ब्राओ एक दिशा’ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजन
मिलिंद जाधव
Monday, January 14, 2019 | 02:34 PM
15 0 0
Share this storyकल्याण : भारतीय संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, त्याचे महत्त्व कळावे व नवीन कवींना विचारमंच उपलब्ध व्हावा या हेतूने कल्याण शहरातील ‘ब्राओ एक दिशा’ या सामाजिक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या संविधान गौरव दिन राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कल्याण शहरातील पंचायत समिती हॉल येथे नुकताच झाला.

या कार्यक्रमासाठी युवा व्याख्याते रोशन पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय थोरात, सिनेगीतकार मंगेश सरदार, संस्थेचे अध्यक्ष नटराज मोरे, कोषाध्यक्ष धनराज चव्हाण, सचिव प्रभा सरदार, केंद्रप्रमुख शामसुंदर दोंदे आदी उपस्थित होते.  ‘नवीन कवींना पुढे आणण्यासाठी ‘ब्राओ’तर्फे आम्ही विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्याचे काम करणार आहोत व नेहमीच नवीन उपक्रम राबविणार असून, संविधान जोपासण्याचे काम आम्ही सातत्याने करणार आहोत,’ असे संस्थेचे अध्यक्ष नटराज मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

रोशन पाटील म्हणाले, ‘एका जातीवर अन्याय झाला, तर सर्व जातींनी एकत्र आले पाहिजे. आपण सर्व वंशाने एक आहोत. महामानवांनी खूप त्याग केला आहे. त्यांच्या विचारांचे काम सर्वांना मिळून करायचे आहे.’

विद्या शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी केले. या संमेलनात सहभागी झालेल्या ४० कवींना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी सेन्हा साळवे यांचे सहकार्य लाभले.काव्यलेखन स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा : पहिला गट (विद्यार्थी)- कुमार प्रशांत त्रिभुवन (अहमदनगर), रवींद्र बंडू उईके (ठाणे), अक्षता अशोक पाटील (मुंबई), अंकिता अशोक पाटील (मुंबई, उत्तेजनार्थ), रेश्मा लक्ष्मण झोरे (मुंबई, उत्तेजनार्थ), राज्ञी सोनावणे (ठाणे, उत्तेजनार्थ). दुसरा गट (शिक्षक)- चारुशीला किरण भामरे (ठाणे, सर्वोत्कृष्ट), धर्मराज शिवानंद पाटील (पालघर, उत्कृष्ट), आबासाहेब निर्मळे (कोल्हापूर प्रथम), डॉ. गंगाराम ढमके (ठाणे), रेश्मा राजेश सोनवणे (भिवंडी), प्रदीप महादेव कासुर्डे (नवी मुंबई, उत्तेजनार्थ), वैभवी विनित गावडे (मुंबई, उत्तेजनार्थ), लक्ष्मण घागस (उत्तेजनार्थ). तिसरा गट (खुला गट)- विशाल नंदा गवळी (सर्वोत्कृष्ट), चेतन सुरेश जाधव (उत्कृष्ट), गौतम अनंत तांबे (प्रथम), उमेश नारायण चव्हाण, गुरुदत वाकदेकर, प्रतिक कांबळे, आकाश प्रकाश सोनवणे (उत्तेजनार्थ), प्रशांत त्रिभुवन (उत्तेजनार्थ) उमा पाटील (उत्तेजनार्थ) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सुचिता सोनार About 63 Days ago
अतिशय सुंदर आणि प्रोत्साहन देणारा अभिनव उपक्रम ...सलाम आपणा साऱ्यांना
0
0

Select Language
Share Link