Next
‘आय फायनान्स’चा १०० शहरांत विस्तार
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 03:22 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आय फायनान्स या आघाडीच्या फिनटेक कंपनीने आपला विस्तार देशातील ११ राज्यांमधील १०० शहरांपर्यंत वाढवला आहे. भारतातील मायक्रो व्यवसायांना संघटित कर्जाच्या कक्षेत आणण्याच्या ध्येयाने प्रेरित असलेली आय की कंपनी या क्षेत्रातील ग्राहकांशी असलेला संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आपले जाळे पसरवत आहे. आय फायनान्सचा उद्देश प्रत्येक शहरातील कर्ज-वंचित लघु उद्योगांना किफायती वित्त पर्याय पुरविणे हा आहे.

आय फायनान्सचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक विक्रम जेटली म्हणाले, ‘आमची सेवा आता ११ राज्यांतील १०० शहरांपर्यंत पोहोचली आहे व त्यामुळे मायक्रो व्यवसायातील अनेक लोकांना कर्ज सुविधा उपलब्ध झाली आहे. मेट्रो, टिअर वन शहरे आणि त्यापलीकडच्या शहरांमध्ये शाखा स्थापन केल्यामुळे आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत आमची सेवा पोहोचविण्यासाठी समर्थ झालो आहोत व परिणामी त्यांच्या गरजेनुसार त्यांना कर्ज देऊ शकतो.’

आय फायनान्सने एक नाविन्यपूर्ण अशी ‘क्लस्टर आधारित क्रेडिट असेसमेंट’ पद्धत तयार केली आहे, ज्यात प्रत्येक उद्योग क्लस्टरची पूर्ण पारख करून मगच मायक्रो व्यवसायांना कर्ज देण्याचा धोका घेतला जातो. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे एमएसएमईमध्ये आय फायनान्स आघाडीवर पोहोचली आहे. आयने ६५ हजारांपेक्षा अधिक ग्राहकांना ८०० कोटींहून अधिक कर्ज दिले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link