Next
इंडस हेल्थ प्लसचा सामाजिक उपक्रम
प्रेस रिलीज
Tuesday, January 23, 2018 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘इंडस हेल्थ प्लस’ या आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने अक्षरदीपच्या मुलांसह अतिशय आनंदात आणि उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा केला. 
‘अक्षरदीप’ ही समाजातील वंचित मुलांना शिक्षण देणाऱ्या ‘स्वाधार’ या संस्थेची उपकंपनी आहे. या भेटीदरम्यान, इंडस हेल्थ प्लसने मूलभूत स्वच्छता आणि निरोगीपणाबाबत मुलांमध्ये जागरूकता निर्माण केली. त्याशिवाय इंडस हेल्थ प्लसच्या कर्मचाऱ्यांनी कुटुंब म्हणून संस्थेला दान दिले आणि मुलांना खाऊ, भेटवस्तू व खेळणी दिली.

इंडस हेल्थ प्लसचे संस्थापक कांचन नायकवडी यांनी सांगितले, ‘इंडस हेल्थ प्लसमध्ये आमचा विश्वास आहे की, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि भविष्यात योग्य संधी मिळण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे असते. आयुष्यात विविध पैलू शोधून, आपल्या आवडत्या क्षेत्रात आपली प्रतिभा दाखविण्यासाठी आयुष्यातील मूलभूत गरजांपासूनही वंचित असणाऱ्या या मुलांना आमच्या पाठिंब्याने नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.’

‘आमच्या मुलांकरिता हा कार्यक्रम करून, मकर संक्रांतीचा दिवस अधिक आनंददायी बनविण्यासाठी इंडस हेल्थ प्लसने केलेल्या मदतीसाठी मी मनापासून आभारी आहे,’ असे अक्षरदीप, पुणेच्या रोहिणी हुलगणे म्हणाल्या.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search