Next
‘रंगोत्सव साजरा करताना काळजी घ्या’
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
प्रेस रिलीज
Friday, March 22, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : होळी सण म्हणजे रंगांची उधळण. हा सण आबालवृद्धांना आकर्षित करतो; मात्र या उत्सवादरम्यान डोळे, त्वचा आणि केस यांची हानी होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

या विषयी बोलताना एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या कॉर्निया कन्सल्टंट रसिका ठाकूर म्हणाल्या, ‘गडद व अधिक काळ त्वचेवर राहणार्‍या रंगांना बाजारात जास्त मागणी दिसते. यामध्ये घातक रासायनिक घटक असू शकतात. यांच्याशी संपर्कात आल्यास डोळ्यांना त्रास, तात्पुरते अंधत्व आणि कंजेंटि होऊ शकतो. कृत्रिम रंगांमध्ये रासायनिक घटक असल्यास तात्पुरते अंधत्व येऊ शकते जे काही मिनिटे किंवा काही तास राहू शकते. आपण किती लवकर उपचार सुरू करत आहोत त्यावर अवलंबून असते. डोळ्यांत रंग गेल्यास डोळे पाण्याने धुवावेत आणि लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वांत योग्य म्हणजे कृत्रिम रंगाचा वापर टाळणे व नैसर्गिक रंगांचा वापर करणे. टोमॅटो, बीट रूट, काही प्रकारची फुले, हळद यांचा वापर करून घरच्या घरी तयार केलेले रंगदेखील योग्य ठरू शकतात.’

इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या त्वचारोगतज्ञ डॉ. निशा पारीख म्हणाल्या, ‘सर्वांत प्रथम आणि महत्त्वाची बाब म्हणजे कृत्रिम रंग न वापरता नैसर्गिक रंगांचा वापर केला जाईल याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. कृत्रिम रंगांच्या वापरामुळे त्वचेला त्रास, खाज येणे, त्वचा कोरडी पडणे, अशा समस्या उद्भवू शकतात. कृत्रिम रंगांमध्ये घातक घटक असतात, जे शरीरातील पेशींना नुकसान पोहचवितात. याबरोबरच त्वचेवर लाल चट्टे येणे, खाज येणे आणि केस कमकुवत होणे अशा समस्यादेखील उद्भवतात. कृत्रिम रंगांमध्ये हानीकारक रसायनांचा समावेश असल्याने कर्करोग उद्भवण्याचीदेखील शक्यता असते.’

‘इनामदार’चे त्वचारोगतज्ञ डॉ. विकास मंटोळे म्हणाले, ‘डोक्यापासून पायापर्यंत विशेषत: रंगांशी थेट संपर्कात येणार्‍या शरीराच्या भागांवर अधिक तेल लावा, संपूर्ण बाह्या असलेले शर्ट आणि फुल पँटचा वापर करा. डोळ्यांसाठी सनग्लासेस वापरा. अशा प्रकरच्या कपड्यांचा वापर करा जे रंग शोषून घेणार नाहीत, केसांना तेल लावणे हे खूप फायद्याचे ठरू शकते. रंग खेळून झाल्यावर पाच ते १० मिनिटे सोप फ्री क्लिन्झर आणि सौम्य शँम्पूचा वापर करून आंघोळ करा. त्वचेवरील रंग घालवण्यासाठी त्वचा घासून धुऊ नका, थोडा रंग राहिल्यास तो हळूहळू कमी होण्यास वेळ जाऊ द्या.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search