Next
‘टॉपर’तर्फे वाणिज्य शाखेचे अध्ययन
प्रेस रिलीज
Saturday, February 17 | 05:48 PM
15 0 0
Share this story

मुंबई : टॉपर या भारताच्या जलदगतीने विकसित होत असलेल्या एज्युटेक व्यासपीठाने २०१८मध्ये आपल्या विस्तारीकरणाच्या योजनांची सुरुवात करत नुकतीच वाणिज्य शाखा सुरू केली. निधीच्या‍ सिरीज बी फेरीनंतर विकासात्मक उपक्रमांच्या सिरीजसह करण्यात आलेला हा एक सुयोग्य बदल आहे.

कंपनीच्या स्ट्रीममध्ये डिजिटायझेशन आणत म्हणजेच पारंपरिक पेडालॉजिकल मॉडेल्ससमध्ये बदल करत लक्षणीय लाभ प्राप्त करण्याचा उद्देश यामागे आहे. हे दाखलीकरण २०२१पर्यंत टॉपरमधील ज्युनिअर ग्रेड सबस्क्रिप्शन २०पट आणि सिनियर ग्रेड सबस्क्रिप्शन १५पट वाढण्यास सहाय्य करेल, अशी अपेक्षा आहे.

वाणिज्य शाखा अनेक करिअर संधी देते; मात्र, एज्युटेक क्षेत्राच्या बाबतीत या शाखेच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले जात आहे. टॉपर विशेषत: परदेशी, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारीसाठी विज्ञान शाखा डिजिटाइज करण्यासह वाणिज्य शाखेला सुद्धा भव्य यश प्राप्त करून देण्याचा उद्देश ठेवते. हे व्यासपीठ शाळाबाह्य ऑनलाइन अध्ययन पर्यायांचा शोध घेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आकर्षक एक छत्री स्थळ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. वाणिज्य शाखेतील विद्या‍र्थी टॉपरमधील आयपीसीसी, सीएटी, सीपीटी व आयसीडब्यूए अशा परीक्षांसाठी तयारी करण्यामध्ये सक्षम होतील.

टॉपरचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक झिशान हयात म्हणाले, ‘प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अध्ययन वैयक्तिक करण्याचा टॉपरचा उद्देश आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत अध्ययनासह सक्षम केल्यानंतर आम्ही पुढील पाऊल उचलण्यास सज्ज‍ होतो. यंदा आम्ही वाणिज्य या सर्वात लोकप्रिय शाखेमधील विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी सर्वोत्तम अध्ययन पद्धती, सखोल रचनात्मक कन्टेन्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा देत आहोत. आमची इच्छा आहे की, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी परदेशी परीक्षांसोबत सीपीटी व आयसीडब्यूए अशा स्पर्धात्मक परीक्षांसाठीह अभ्यांसाची उत्त्म सुविधा देणारे एक व्यासपीठ म्हणून टॉपरची ओळख व्हावी.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link