Next
दामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘एक विलक्षण दिवस’
BOI
Friday, February 08, 2019 | 05:02 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
रत्नागिरी नगर परिषदेची शाळा क्रमांक १५ अर्थात दामले विद्यालयात नुकताच ‘एक विलक्षण दिवस’ हा उपक्रम राबविण्यात आला. एरव्ही जिथे केवळ अभ्यासाचे वातावरण असते, त्या शाळेत विद्यार्थ्यांनी एक पूर्ण दिवस आणि रात्रभर राहून अनुभवविश्व समृद्ध करायचे, आपले कलागुण सादर करायचे आणि मिळणारी ऊर्जा घेऊन पुढे अधिक जोमाने अभ्यास करायचा, हे या उपक्रमामागचे सूत्र आहे. यंदा या उपक्रमाचे सहावे वर्ष होते. ‘फन बीयाँड लिमिटस्’ हे ब्रीदवाक्य असलेला हा उपक्रम शनिवार-रविवारी (दोन-तीन फेब्रुवारी २०१९) शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. विद्यालयाच्या २५७ विद्यार्थ्यांनी हा विलक्षण दिवस अनुभवला. शनिवारी दुपारी तीन वाजता उपक्रमाला सुरुवात झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनीच केले होते. प्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी व स्वागत करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनीच शोधून काढलेल्या सामान्यज्ञानाच्या प्रश्नांवर आधारित चालता-बोलता स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तीन प्रश्नांची जलद अचूक उत्तरे देणाच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी स्वत:च तयार केलेली सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन निखिल कांबळे व आर्यन पानकर या विद्यार्थ्यांनी केले.विविध मजेदार खेळांचा समावेश असलेल्या वन मिनिट किंग आणि क्वीन या स्पर्धेत निखिल कांबळे हा किंग, तर सिद्धी जाधव ही क्वीन ठरली. नगरसेविका श्रद्धा हळदणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक कांबळे, मुख्याध्यापक प्रकाश जाधव यांच्या हस्ते या दोघांना मानाचा पट्टा व चषक देऊन गौरविण्यात आले. सगळ्यांचा आवडता आणि बुद्धीला खुराक पुरविणारा खेळ म्हणजे खजिन्याचा शोध. यात सातवी ब संघाने खजिना सर्वांत कमी वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला. सहावी ब संघाला द्वितीय, तर पाचवी ब संघाला तृतीय क्रमांक मिळाला.सायंकाळी दिवेलागणीच्या वेळेला मान्यवरांच्या हस्ते तुळशीसमोर दिवा लावून शुभंकरोती म्हणण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वत:च निर्मिती केलेल्या संगीत रजनी या भक्ती आणि भावगीतांच्या सुरेल कार्यक्रमाची मैफल रंगली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुची पाष्टे आणि राधिका पटवर्धन या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘खंडेरायाच्या लग्नाला’ या गाण्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना ठेका धरायला लावला. संगीत रजनी कार्यक्रमाला २००हून अधिक पालक उपस्थित होते. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.

शेकोटी कार्यक्रमात ज्वाला गीत, तसेच शेकोटीच्या अनेक गाण्यांवर विद्यार्थ्यांनी शेकोटी नृत्यही सादर केले. रात्री उशिरा विद्यार्थ्यांना अवकाश दर्शनाची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या मनात असणाऱ्या अंधश्रद्धेविषयीच्या प्रश्नांची उकल शिक्षकांनी करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मनसोक्त वैज्ञानिक गप्पा उत्तररात्रीपर्यंत सुरू होत्या. सकाळी उठल्यावर विद्यार्थ्यांसाठी किल्ला लढविणे, चीनची भिंत यांसारखे असीम ऊर्जा देणारे खेळ घेण्यात आले. पालक दुसऱ्या दिवशी आपल्या पाल्यांना नेण्यासाठी आले असतानाही विद्यार्थ्यांना हा विलक्षण अनुभव सोडून घरी परतणे जड जात होते. पुढील वर्षभरासाठी असीम ऊर्जा पुरविणारा हा कार्यक्रम दामले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनसोक्त अनुभवला.

नगर परिषद, जिल्हा परिषद यांसारख्या सरकारी संस्थांच्या शाळांमध्ये चाकोरीबाहेरचे उपक्रम राबवण्याचे प्रमाण कमी असते. शतकोत्सवी दामले विद्यालय मात्र याला अपवाद असून, असे वेगवेगळे उपक्रम हिरिरीने राबविण्यात दामले विद्यालय आघाडीवर असते. येथील शिक्षक वर्गाच्या पुढाकाराला विद्यार्थी आणि पालक वर्गाचीही चांगली साथ मिळत असल्याने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडतात. 

(या उपक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये..) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्रकाश जाधव About 45 Days ago
आपल्या शुभेच्छा आणि सुचना नम्रपणे स्वीका रून या कार्यक्रमात पुढील वर्षि नवीन काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करू.
1
0
Smita prabhakar kamble About 45 Days ago
Nice Programme ,
0
0
Nilima yadav About 45 Days ago
खूपच सुंदर उपक्रम दामले विद्यालय आणि सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन
0
0
Mugdha Sanjay Kulaye About 45 Days ago
मुलांच्या जवळ जाण्यासाठी, त्यांच्यातील उत्तम ते शोधण्यासाठी खूप रंजक व प्रभावी उपक्रम. सर्व शिक्षकांचे मुलांचे, पालकांचे अभिनंदन.
1
0
Yogesh kadam About 45 Days ago
Apratim. Damaleains always rock. Damale vidyalay means Innovation .
3
0
Akshaya Anil Chavan About 45 Days ago
Mala ha upkram khup khup chan vatla ani asa karyakram shalet suru kelyabaddle damle vidyalayatil sarv shikhak ani vidyarthyanche manpurvk abhar ani pudhil vatchalisathi shubhechcha dhanyavad
2
0

Select Language
Share Link