Next
राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत रक्तदान शिबिर
BOI
Wednesday, February 27, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this story


कुसगाव : श्रीमती काशीबाई नवले सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले यांच्या हस्ते झाले.

 या वेळी सिंहगड लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, निवृत्ती बाबाजी नवले कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, स्थावर मालमत्ता अधिकारी पंकज जाधव, कार्यक्रमाधिकारी प्रा. सुहास चव्हाण, प्रा. सुमित देवर्षी आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरांतर्गत एकूण १०६ युनिट रक्त संकलित करण्यात आले. जे श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांना मोफत देण्यात आले. 

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रीमती काशीबाई नवले सामान्य रुग्णालय रक्तपेढी व सिंहगड इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष प्रयत्न केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link