Next
‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला ‘बेस्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्स– इंडिया २०१९’ पुरस्कार
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीने ‘बेस्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्स– इंडिया २०१९’ हा प्रतिष्ठित बिझनेस व्हिजन (बीव्ही) पुरस्कार जिंकला.

हा पुरस्कार जाहीर करताना बिझनेस व्हिजनतर्फे सांगण्यात आले की, ‘जागतिकीकरणाची चिंता वाढत असताना जगाला आदर्शाची गरज आहे. सध्या अशा जागतिक कंपन्यांची गरज आहे, ज्या आपल्या सर्व भागधारकांच्या फायद्यासाठी काम करतील. महिंद्रा अँड महिंद्रा अशाप्रकारचीच कंपनी आहे. एरवी शाश्वततेचे ‘पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट’ हे तीन ‘पी’ असले, तरी महिंद्रा ‘प्रॅक्टिसिंग गुड गव्हर्नन्स अॅज ए प्रोसेस’ (चांगल्या प्रशासकीय कामकाजाचा प्रक्रियेत अंतर्भाव) या आणखी एका ‘पी’साठी ओळखली जाते.’

‘‘महिंद्रा’ने दमदार कॉर्पोरेट प्रशासनाचा भक्कम पाया बनवला असून, त्याद्वारे ती कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण आणि शाश्वत विकास घडवून आणत आहे. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’साठी चांगले कॉर्पोरेट प्रशासन हे इच्छित सर्व शक्य घडवून आणण्याची किल्ली आहे आणि ‘बीव्ही’ परीक्षक मंडळ कंपनीची कायदेशीर आवश्यकतांच्या बाबतीत तुलनेने पुढे राहाण्याच्या वृत्तीचा इतिहास तसेच व्यवसायांचा पाया शक्य तितका मजबूत असावा यासाठी सातत्याने प्रशासकीय धोरणांचा अवलंब करण्याची खात्री राहावी यासाठी वापरला जाणारा संवादी दृष्टीकोन पाहून प्रभावित झाले,’ असे या प्रसंगी सांगण्यात आले.

परीक्षकांनी एकमुखाने ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला बेस्ट कॉर्पोरेट गव्हर्नन्स (इंडिया) २०१९’चे विजेते म्हणून जाहीर केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search