Next
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयकपदी सुहास उभे
प्रेस रिलीज
Tuesday, June 25, 2019 | 03:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयक पदावर कोथरुड येथील युवा कार्यकर्ते सुहास उभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. 

सुहास उभे यांच्याकडे पक्षाच्या विविध आघाड्या आणि सेल (विभाग) यांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुहास यांना या पूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. 

‘पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी युवकांना संधी देण्याची भूमिका घेतल्यामुळे संधी मिळाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेत संपूर्ण महाराष्ट्रातील असलेला जनसंपर्क पाहून अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी माझी निवड केली. पक्षातील आघाड्या आणि विभाग सक्षम करणे, संवाद-उपक्रम वाढवणे आणि त्यातून पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी कार्यरत राहणार आहे,’ असे सुहास उभे यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search